वाशीम : महेंद्र महाजन –
शिरपूर जैन जवळील मौजे घाटा येथील प्रा. भानुदास वामनराव सोमटकर यांना अमरावती विद्यापीठाने इंग्रजी विषयात आचार्य पदवी (पीएचडी) ने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी डोरीस लेसींग्स आर्ट इन स्टडी ऑफ फिमेल एक्सपिरीएंसेस या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. व्ही.जे. रेड्डी हैद्राबाद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते कला व विज्ञान महिला महाविद्यालय मेहकर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल केशव गोटे, काशीराम गोटे, विनोद गोटे, मनोज गोटे, विकास गोटे, चरण गोटे तसेच के.के. मित्रमंडळाने अभिनंदन केले आहे.
via Blogger http://ift.tt/2mYtK03
from WordPress http://ift.tt/2lI3ndF
via IFTTT
No comments:
Post a Comment