चांगल्या कामाचा व व्यक्तीचा गुणगौरव म्हणजे त्याच्या सेवेची पावती आणि ही पावती देणे समाजाचे कर्तव्य आहे.
अश्याच एका व्यक्तिमत्वाचा उत्कृष्ठ कामाबद्दल विभागीय आयुक्त अमरावती जिल्हा यांनी नुकताच सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.ते व्यक्तिमत्व म्हणजे अचलपूर नगरपालीकेचे सर्वपरिचित राजाभाऊ देशमुख अचलपूर नगरपालिका येथे कार्यरत असलेले राजाभाऊ देशमुख यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणुन आपली सेवा देत असले तरी जनगणना असो की निवडणूका त्यांच्या कार्यपद्धतीला पाहून महसुल विभाग व नगरपालिका त्यांना या कामाची जबाबदारी देतात व ते सुध्दा तत्परतेने जबाबदारी वर उपस्थित राहून काटेकोरपणे पार पाडतात.
नुकत्याच पदवीधर,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्या याकरिता अचलपूर मतदार संघातील निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी राठोड साहेब यांनी त्यांना या कार्याला व्यवस्थीत पार पाडण्यासाठी पाचारण केले त्यांनी अतिशय चोखपणे आपली जबाबदारी पार पाडून दोन्ही निवडणूका यशस्वीपणे संपन्न करण्यात त्यांनी निवडणूक विभागाला सहकार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी राजाभाऊंचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.याबाबत बोलतांना राजाभाऊंनी आपले सर्व सहकारी यांचे सहकार्य व निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या संधी बद्दल प्रशासनाचे आभार मानले तसेच यापुढेही आपल्याला संधी मिळाली तर आपण उपस्थीत राहून कार्य करण्यासाठी तयार राहू असे मत व्यक्त केले.या सत्कार समारंभाला अचलपूरचे उपविभागीय अधिकारी व्यंकटेश राठोड यांचा उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.राजाभाऊंची सेवानीवृती जून 17 मध्ये आहे
via Blogger http://ift.tt/2mTOXIq
from WordPress http://ift.tt/2lCAXC1
via IFTTT
No comments:
Post a Comment