Latest News

हे अवलिया गजानना विकास आराखड्यातिल या समजदार व्यक्तींना क्षमा कर……

प्रतिनिधी:-समीर देशमुख –  महेंद्र मिश्रा

शेगांव श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शेगांव संत नगरीला विकासात्मक दर्जा देत संत गजानन महाराजांच्या शताब्दी सोहळ्या करिता त्या वेळेसाच्या सरकारनी ३५० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला गेला जर्न येथे देश विदेशातील महाराजांचे भक्तगण दर्शना करीत येतात त्यांना सर्व सोई उपलब्ध व्हावे या धर्तीवर या विकास आराखड्याची कल्पना साखारण्यात आली व २००९ मध्येच सुरुवात करण्यात आली व २०१० मध्ये गजानन महाराजांचा शताब्दी सोहळा पार पडला व त्या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता डोळ्याचे पारणे फेडणारा तो क्षण “याची देही याची डोळा” लाखो भाविक भक्तनि अनुभवला पण शेगांवचे दुर्दैव विकास विकास आराखडा हा कागदावरच उरला.
  वर्षा मागून वर्ष येत गेली संत गजानन महाराजांचे उत्सव साला बाद प्रमाणे पार पडत गेली व आज १७ वर्ष उदयास आले  पण विकास आराखडा पुर्नतास जाताना दिसत नाही. याला कारण विकास आराखड्यातील जबाबदार अधिकारी वर्ग,प्रतिनिधी व ठेकेदारच म्हणूनच संत गजानन महाराजांना प्रगट दिन प्रसंगी प्रार्थना करतो “बा गजानना विकास आराखड्यातील ठेकेदार लोक प्रतिनिधी अधिकाऱ्यांना क्षमा करा”
  ज्या संत चरणीं लहान मोठे उच्च श्रेणीतील पदाधिकारी व अधिकारी नतमस्तक होऊन आपल्या जीवनातील सुखी संसाराचे मागणं मागतात त्या संत विभूतीच्या कर्म भूमीचा विकास आराखडा रखडल्या जातो अशांना काय म्हणावे हेच आता कळेनासे झाले आहे.
   तीन वर्षं पूर्ण होणारा विकास आराखडा आठव्या वर्षातही पूर्ण होताना दिसत नाही व गेल्या आठ वर्षात कित्येक अधिकारी पालकमंत्री बदलत गेले व नवीन येत गेले पण प्रत्यकानीच मोठे पानांची जबाबदारी जाणीवपूर्वक न घेता बोलायची कढी न बोल्याचाच भात करण्यात धन्यता मानली असे म्हणणे वावगे ठरणार नाही
      विकास आराखड्यातील महत्वपूर्ण  एकमेव मार्ग म्हणजे परिक्रमा मार्ग आहे. ज्या रस्त्यावरून राज वैभवी थाटात वैभवसाठी परंपरेला संत  गजानन महाराजांची पालखी गाव परिक्रम करण्याकरिता प्रत्येक उत्सव दर्शन मार्गस्त होत असते असा परिक्रमा मार्ग या आठ वर्षाच्या कालावधीत सुद्धा पूर्ण होत नसल्याचे दुःख भक्तास जिव्हारी लागत आहे. संत गजानन महाराज संस्थांचा पारदर्शक कारभार बांधकाम कौशल्य व स्वच्छता हि जगभर पसरली आहे व त्यांवर पी.एच. डि सुद्धा अनेक जण करीत असतांना सुद्धा या विकास आराखड्यातील सर्व जबाबदार ठेकेदार अधिकारी वर्गातील निकृष्ट दर्जाचि कामे तेही लोंबळत ठेवण्याची कुबुद्धी कशी आली यांचेही नवल वाटत आहे.
      ३५० कोटींचा विकास आराखडा या आठ वर्षात ५०० कोटी च्या वर जातांना दिसत आहे पण शेगांव चा विकास दम घुटताना दिसत आहे. सुरवातीला झालेले रस्ते आज उखडतांना दिसत आहे ‘मागच सपाट समोरचा विकास’ अशीच या आराखड्याची गोट होत आहे.
कुठल्याही रस्त्याची परिपूर्णता नाही कुठे वर आहेत तर कुठे खाली आहे अशीच नाली व रस्त्यांची परिस्तिथी निर्माण झाली आहे नाल्यातील जमा झालेली घाण तशीच कायम आहे. रस्त्यावरचे पेअरब्लॉक अर्धवटच आहे याचे दुःख पालकमंत्री,प्रतिनिधी,ठेकेदार व अधिकाऱ्यांना का वाटत नसेल.
  म्हणून म्हणावेसे वाटते
   हे अवलिया गजानना विकास आराखड्यातील पदाधिकारी ठेकेदार, प्रतिनिधी व अधिकारी यांना आता क्षमा क्षमा क्षमाच कर……….

via Blogger http://ift.tt/2m3i9zk




from WordPress http://ift.tt/2miXTu3
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.