अचलपूर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते तसेच शिक्षण,क्रिडा व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून ख्याती प्राप्त आहे.अशा या शहराच्या नावलौकिकात शुकमनी बाबरेकर याने भर घातली.
शुकमनी बाबरेकर याला 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान सातारा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत आयोजित राष्ट्रीय धर्नुविद्या स्पर्धेत एक सील्वर व एक ब्रांझ पदक प्राप्त झाले तसेच एशिया कप ट्रायल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून बँकाक,थायलंड येथे होणा-या आंतरराष्ट्रीय धर्नुविद्या एशिया कप करिता भारतीय चमुत त्याची निवड
झाली त्याचे वडिल गजाननराव बाबरेकर स्थानीक जगदंब
विद्यालयात मुख्याध्यापक असून आई आदर्श गृहीणी आहे.त्याची एशिया कप करिता निवड झाल्याने अचलपूर शहराच्या सन्मानात मानाचा तुरा बाबरेकर परीवाराने खोवला असुन सर्वच स्तरातून त्याच्यावर व परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शुकमनी आपल्या या निवडीबद्दल व यशाचे श्रेय अँड.प्रशांत देशपांडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धर्नुविद्या असोसिएशन,प्रमोद चांदुरकर सचिव,तसेच मार्गदर्शक शिक्षक प्रफुल्ल डांगे,समिर म्हस्के, आईवडील व भाऊ यांना देतो त्यांच्या पुढील यशाकरीता जगदंब विद्यालायातर्फे संस्थेचे अध्यक्ष रमाकांतजी शेरकार,भिमराव दखने व समस्त सदस्य व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने शुभेच्छा त्याला दिल्या आहेत.
via Blogger http://ift.tt/2mErVWZ
from WordPress http://ift.tt/2lq2NRD
via IFTTT
No comments:
Post a Comment