जम्मु काश्मीर येथे मार्च महिन्यात होणार्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेकरीता रिसोड तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवासी व सन्मती कॉलेजमध्ये शिकत असलेला वाशीम जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशनचा खेळाडू शेषनारायण देशमुख याची निवड करण्यात आली.
नागपूर येथे 18 व 19 ङ्गेब्रुवारी रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेतील सब ज्युनिअर व ज्युनिर तसेच सिनियर गटामध्ये शेषनारायण देशमुखने 53 किलो वजनी गटामध्ये चमकदार कामगिरी करुन सुवर्णपदक पटकावुन जिल्हयाचा नावलौकीक वाढविला. या स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे त्याची आगामी मार्च महिन्यातील 21 ते 25 तारखेला जम्मु काश्मीर येथे होणार्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. या स्पर्धेतील यशाकरीता त्याला असेसिएशनचे अध्यक्ष विनायक जवळकर, वेट लिफ्टींगचे अध्यक्ष धनंजय वानखेडे, सचिव नारायण ठेंगडे, मास रेसलिंगचे सचिव रणजीत कथडे व प्रशिक्षक इब्राहीम खान यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या आधी त्याने मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी करुन पदक पटकावले होते. आपल्या यशाचे श्रेय तो आईवडील व गुरुजनांना देतो. या यशाबद्दल त्याचे शुभम कंकाळ, वैभव कडवे, अमोल सुरुशे व मित्रपरिवाराकडून कौतुक होत आहे.
via Blogger http://ift.tt/2md0aXX
from WordPress http://ift.tt/2msIf03
via IFTTT
No comments:
Post a Comment