Latest News

नगरसेवक असावा तर असा,मतदारांना – स्वखर्चातून पुरवीतो नागरी सुविधा

अचलपूर  / श्री प्रमोद नैकेले /-

 निवडणूका असल्याकी सर्वच मतदारांच्या अडचणी एकतात व मोठमोठी आश्वासने देतात.निवडणूक झाली की अपयशी ठरलेल्या समाजसेवक म्हणवून घेणारे तर दिसतच नाही पण निवडून आलेले सुध्दा अदृश्य होतात.अचलपूर शहरात मात्र एका नगरसेवकाने खरा नगसेवक असल्याचे आपल्या कर्तृत्वाने
दाखवून दिले आहे.
अचलपूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17(ब) मधून प्रथमच भाजपा चे नगरसेवक म्हणून निवडून आलेले विवेक श्रीकृष्ण सोनपरोते यांनी आपल्या प्रभागातील नागरीकांच्या गैरसोयीची दखल घेतली व नगरपालिका ती दुर करण्याची
वाट न बघता स्वखर्चाने मजूर लावून प्रभागातील नाली
खोदून घेऊन स्वच्छता मोहीम राबवली तसेच निघालेली घाण व कचरा योग्य जागेवर टाकून त्याची विल्लेवाट लावली विवेक सोनपरोते या युवा नगरसेवकाबद्दल सर्वत्र कौतुकास्पद बोल ऐकायला येत आहेत.नागरीक म्हणतात की नगरसेवक असावा तर असा.असेच नागरिकांचे हित जपणारे नगरसेवक निवडून आले तर सपुंर्ण शहराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असेही बोलल्या जात आहे.

via Blogger http://ift.tt/2mdbovw




from WordPress http://ift.tt/2msGMqD
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.