Latest News

शेतकऱ्यांनी पडकला अवैध रेती वाहतुकीचा विना नंबरचा ट्रॅक्टर – महसुल विभागाला बसली चांगलीच चपराक – अनेक महिन्यांपासुन तालुक्यात रेती माफीयांचा सुरू आहे धुमाकुळ

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान)-

तालुक्यात रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे अनेक महिन्यांपासुन सुरू आहे. यामध्ये सरकारचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडतोच आहे पण नदीपात्राचीही हानी होतेय. वाळूच्या वाहतुकीस परवानगी नसतानाही दिवसा ढवळ्या हा धंदा सुरू आहे. अशातच तालुक्यातील कवठा कडु येथील टाकळी तलावाच्या नदीतुन बुधवारी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या एका विना नंबरच्या ट्रॅक्टरला चक्क शेतकऱ्यांनीच पकडले असुन या ट्रॅक्टरचा चालक, मजुर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झालेत. यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या महसुल विभागाला चांगलीच चपराक बसली आहे.
       शहरातील बायपास रस्त्याने, घुईखेड एस्सप्रेस हायवेने, कवठा कडुसह इतरही अनेक गावांत चांदुर रेल्वे महसुल विभागाच्या आशिर्वादाने अवैध रेती माफीयांचा धुमाकुळ सुरू अाहे. या अवैध वाहतुकीने शासनाला चुना तर लागतच आहे यासोबतच रस्त्यांचीही अक्षरश: वाट लागत आहे. असे असतांना तालुक्यातील कवठा कडु येथील गट नंबर ५०, ५२, ७१, ७२ च्या मधातुन जाणाऱ्या टाकळी तलावाच्या नदीतुन अनेक दिवसांपासुन अवैध रेती उपसा सुरू होता. बुधवारीसुध्दा या ठिकाणी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान एक ट्रॅक्टर उभा होता तर एक ट्रॅक्टर थोड्याच वेळा पहिले निघुन गेला होता. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमध्ये अंदाजे २.५० ब्रास रेतीचा माल भरलेला होता. सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीवरवर कुठलाही नंबर नव्हता. अवैध रेती उपसा सुरू असल्याचे कवठा कडु येथील शेतकरी सुनिल मेश्राम व आनंद खाबिया यांच्या लक्षात येताच त्यांनी ट्रॅक्टरकडे धाव घेतली. मात्र ट्रॅक्टरवरील चालक व मजुर ट्रॅक्टर सोडुन पळुन गेले. या घटनेची माहिती कवठा कडु येथील तलाठी सी.यु. तामगाडगे यांना देण्यात आली. त्यांनी घटनेचा पंचनामा शेतकऱ्यांना समक्ष केला.  याआधी सुध्दा या नदीतुन जवळपास १५० ट्रॅक्टरने अवैध रेती वाहतुक केल्याचे समजते. सुनिल मेश्राम, आनंद खाबिया यांनी त्यांच्या शेतात संरक्षणार्थ लावलेले फाळी, गोटे सुध्दा रेती माफीयांनी काढल्यामुळे त्यांच्या शेतांचे सुध्दा नुकसान झाले आहे. महसूल आणि रेती माफीया यांच्या संगनमतानं हा धंदा राजरोस सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडुन केला जोतोय. रेतीचा हा एक दाणा तयार व्हायला चारशे वर्ष लागतात पण टाकळी तलावाच्या नदी पात्रातून या रेतीची सर्रास वाहतूक केली जातेय. लाखो रुपयांच्या महसूलाचं नुकसान होतंय अर्थातंच महसूल आणि रेती माफियांच्या संगनमताशिवाय हे होऊच शकत नाही. हा बेकायदा रेतीउपसा राजरोसपणे चालू असताना अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे उघड डोळेझाक केली आहे. परंतु  बुधवारी शेतकऱ्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे महसुल विभागाला चांगलीच चपराक बसली एवढे मात्र नक्की..

via Blogger http://ift.tt/2md0171




from WordPress http://ift.tt/2lpScX5
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.