वाशीम – रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील बौध्द महिलेवर सामुहिक अत्याचार प्रकरणाचा सत्यमेव जयते फाऊंडेशनच्या वतीने निषेध करण्यात आला असून पिडीत महिलेला जाळून मारणार्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर अंभोरे यांनी शनिवार, 18 मार्च रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील पिडीत महिलेवर सामुहिक अत्याचार करुन जाळून मारले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करुन तालुका आरोग्य अधिकारी, तालुका न्यायदंडाधिकारी तथा तहसिलदार रिसोड, पोलीस निरिक्षक रिसोड, पोलीस उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा सत्यमेव जयते फाऊंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन देते वेळेस संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर अंभोरे, जिल्हा अध्यक्षा सौ. गौकर्णा पडघाण, जिल्हा सचिव प्रभु मोरे, जिल्हा युवक अध्यक्ष अशोक पडघान, तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, मंगरुळपीर ता तालुका अध्यक्ष देविदास भगत, मालेगाव तालुका अध्यक्ष कमलाबाई कांबळे, गंगाबाई भालेराव, वेणूबाई ढोबळे, पुष्पा फुलउंबरकर, नर्मदा वाणी, शिला अंभोरे, मिलनकुमार, देविदास भगत आदींची उपस्थिती होती.
via Blogger http://ift.tt/2nkOgf9
from WordPress http://ift.tt/2nkGrWS
via IFTTT
No comments:
Post a Comment