वाशिम / महेंद्र महाजन –
वाशीम – स्थानिक पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्स येथील स्टाईल ऍन्ड स्माईलचे संचालक गोविंद डीडवाणी यांनी नागपूर येथील सेंटर पॉईंट हॉटेल येथे आयोजीत अखिल भारतीय सर्च सलुन इंडिया असोसिएशनच्या वतीने महिलांच्या हेअरकट स्पर्धेत सहभाग नोंदवून देशातून तृतीय क्रमांक प्राप्त करुन जिल्हयाचा गौरव वाढविला.
सदर स्पर्धेत दहा मिनीटाचा वेळ देण्यात येवून गोविंद डीडवाणी यांनी सात मिनीटे 38 सेकंदात स्पर्धा पुर्ण केली. यावेळी अहमदाबाद येथील मास्टर पंकज व दिल्ली येथील अशोक पालीवाल यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
via Blogger http://ift.tt/2nPGIOg
from WordPress http://ift.tt/2nPHM4P
via IFTTT
No comments:
Post a Comment