वाशीम – पुष्पगिरी तिर्थचे प्रणेता आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज, मुनीश्री पुज्यसागरजी महाराज यांचे वाशीम येथून विहार अनसिंग मार्गे हैद्राबादकडे झाले आहे. आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज यांनी वाशीम येथे दोन दिवस थांबून भक्तांना प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे गावात ढोलताशाच्या निनादात भव्य शोभायात्रेव्दारे स्वागत करण्यात आले. विहाराच्या वेळी कैलासचंद्र पाटणी, रवि बज, प्रविण पाटणी, अमित पाटणी, जितेंद्र छाबडा, विनोद गडेकर, श्रैणीक भुरे, अशोक टिकाईत, चंद्रशेखर उखळकर, सचिन गोधा, प्रकाशचंद गोधा, रमेशचंद्र बज समवेत सकल जैन समाज महिला मंडळ उपस्थित होते. परतीच्या प्रवासात वाशीमला एक महिना वेळ देणार असल्याचे आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज यांनी भक्तांना सांगीतले.
via Blogger http://ift.tt/2nkAIQW
from WordPress http://ift.tt/2nkNM8N
via IFTTT
No comments:
Post a Comment