Latest News

घरी शौचालय नसलेल्या पालकांची न.प. शाळेत झाली सभा – स्वच्छ भारत अभियानांतर्गत न.प. चे आयोजन

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

स्वच्छ भारत, सुंदर नगर या संकल्पनेतून आपले गांव कसे चांगले राहिल या करीता स्थानिक नगर परिषद येथील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक प्रयत्न करीत आहे. शहराच उघड्यावर कोणी शौचालयाला जावू नये याकरीता गुडमाॅर्निंग पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने सकाळी शहरातील जनतेला उघड्यावर शौचालय जावू नये म्हणून गुलाब पुष्प दिले तर काही लोकांना पोलिस स्टेशनमध्ये आणून समज दिली. यानंतर आता स्थानिक नगर परीषदेच्या सर्व शाळांमध्ये ज्यांच्या घरी शौचालय नाही अशा पालकांची सभा घेण्यात आली व त्यांच्या अडचणी जाणुन घेण्यात आल्या.


         स्वच्छ भारत अभियांतर्गत चांदुर रेल्वे शहर हागणदारीमुक्त घोषीत करण्याच्या उद्देशाने स्थानिक नगर परीषदेतर्फे शहरातील नगर परीषदच्या सर्व शाळांमध्ये शौचालय नसलेल्या पालकांना शाळेत बोलाविण्यात आले होते. यावेळी पालकांना विचारण्यात आले की शासनातर्फे शौचालय बांधकामाकरीता निधी मिळत असतांनाही शौचालय अद्यापही का बांधण्यात आलेले नाही ? यावर अनेकांनी आपल्या समस्या मान्यवरांसमोर मांडल्या. कोणाकडे जागा नाही तर कोणाची जागा नावे नाही असे अनेक प्रश्न उद्भवले. यावर चर्चा करून  समस्यांचे निराकरण करून काही पालक शौचालय बांधणीसाठी राजी झाले.


        यावेळी नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, नगरसेवक सतपाल वरठे, सौ. लांजेवार, सौ. माकोडे, सौ. शर्मा, सौ. मिसाळ, न.प. आरोग्य निरीक्षक नितीन इमले, मुख्याध्यापक नितीन नंदनवार, शिक्षकवृदांसह पालक प्रामुख्याने उपस्थित होते. 

via Blogger http://ift.tt/2nPTxrD




from WordPress http://ift.tt/2nPQQ9N
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.