स्थानिक पोलीस स्टेशनमधील वादग्रस्त ठरलेले ठाणेदार अवचार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हाभर गाजलेल्या शहरातील पत्रकार हल्ला प्रकरणात केलेल्या दिरंगाईमुळे या ठाणेदाराची उचलबांगडी करण्यात आल्याचे समजते. त्यांच्या जागी थेट मुंबई येथील पोलीस स्टेशनमधुन ठाणेदार शेळके यांची स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा स्थानिक सी.सी.एन. न्युज चॅनलचे संचालक अमोल गवळी नेहमी प्रमाणे वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळी कार्यालयात बसले असतांना 10 ते 15 गुंड प्रवृतीच्या लोकांनी कार्यालयात घुसून त्यांच्या वर हल्ला चढविला होता. त्याचवेळी कार्यालयात बसलेले अंकुश खाडे व सागर गावंडे या दोघांवरही हल्ला करण्यात आला होता. नागरिकांची गर्दी वाढतच हल्लेखोरांनी आपला घटना स्थळावरून पळ काढला होता. या हल्ल्यात विशेष म्हणजे हल्लेखोरांसह अमोल, गवळी, नितीन गवळी व इतर सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा केवळ हल्लेखोरांच्याच सांगण्यावरून नोंदविण्यात आला. गवळी बंधुंवर यापहिले कोणतेही गुन्हे दाखल नव्हते. हे खोटे गुन्हे पोलीसांचे हात ओले झाल्यावर केल्याची शहरात जोरदार चर्चा होती. हे प्रकरण वृत्तपत्रांतुन चांगलेच गाजले होते व त्यात ठाणेदारांची
मवाळ भूमिकाही उघड केली होती. परिणामी
ठाणेदारांची उचलबांगडी झाली आहे. त्यांची बदली ही केवळ 2 महिन्यांतच झाली. मात्र हा दोन महिन्यांचाही त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. तसेच त्यांचे कर्मचाऱ्यांवरही कोणत्याची प्रकारचे वचक नव्हते. शहरात अवैध धंदे त्यांच्या कार्यकाळात जोमात सुरू होते. याचाच फटका त्यांना बसला व त्यांचे शहरातुन स्थानांतरण करण्यात आले. त्यांच्या जागी मुंबईतील भांडुप पोलीस स्टेशनमधुन ब्रम्हदेव सखारामजी शेळके हे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये रूजु झाले आहे. त्यामुळे नवीनच रूजु झालेले ठाणेदार शेकळे यांनी कर्मचाऱ्यांवर आपले वचक ठेवावे, शहरातील अवैध धंद्यांना लगाम लावावा, तक्रारकर्त्यांना विनाकारण त्रास देऊ नये तसेच प्रत्येक प्रकरणाची चौकशी नि:पक्ष व्हावी हीच अपेक्षा शहरवासीयांची आहे. अशातच ठाणेदार शळके हे शहरवासीयांच्या अपेक्षांवर खरे उतरतात का हे पाहणे औचित्याचे आहे..
via Blogger http://ift.tt/2nBnpYY
from WordPress http://ift.tt/2mJA7ax
via IFTTT
No comments:
Post a Comment