शहरात तालुका कृषी कार्यालय असुन या कार्यालयात अधिकारी मात्र शेतकऱ्यांना सापडत नसल्याने कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासुन वंचित रहावे लागत आहे. तरीही याकडे कोणतेही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध कामाच्या अडचणीच्या समोर जावे लागते.
तालुक्यात विविध शासकीय कार्यालय आहेत. परंतु बऱ्याच विभागाचे अधिकारी कार्यालयात नसतात. अशातच शहरातील तालुका कृषी अधिकारी ठाकरे प्रभारी असल्याने त्यांचे मंडळ अधिकारी आणि कृषी सहायक यांच्यावर कुठलेच वचक राहिलेले नाही. या कार्यालयातील कर्मचारी आप आपल्या सोईनुसार कामावर येतात. तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळत नाही. कारण जवाबदार अधिकारी कार्यालयात नसल्याने बाकी कर्मचारीही दिसत नाहीत. या कार्यालयात हा लपन छुपनीचा खेळ बऱ्याच दिवसापासुन चालत आहे. या कार्यालयातील बहुतांश कर्मचारी मुख्यालयी न राहता एस.टी. बसच्या वेळापत्रकानुसार येणे जाणे करत असतात. या कार्यालयात कोन केव्हा येतो व कोन केव्हा जातो याचा मात्र पत्ता लागत नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांनी व पत्रकारांनी चौकशी केली असता साहेब बैठकीला जिल्ह्यावर गेले आहेत. व कृषी सहाय्यक खेड्याला साईडवर गेले असे सागण्यात येते.
कार्यालयातील अधिकारी आजुबाजुच्या परीसरातुन अप-डाऊन करतात. यांना कार्यालयात येण्यासाठी बारा वाजतात. कार्यालययात दुपार नंतर ग्रामीण भागातील गावांना भेट देण्याचे कारण सांगून कार्यालया बाहेर पडतात. यांच्या या लहरी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी कार्यालयात आणि कर्मचारी आपल्या शहराकडे असा प्रकार पहावयास मिळत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी अनेक महत्वपूर्ण योजना राबवित आहेत. पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. यामुळे या कार्यालयाविषयी तालुक्यातून शेतकरी वर्ग तिव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुका कृषी कार्यालयातील प्रभारी राजमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त राहिली नाही. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावून दररोज कार्यालयात वेळेवर हजर राहाण्याची सक्ती करावी. व स्वत: कृषी अधिकाऱ्यांनी देखील वेळेवर कार्यालयात यावे जेणेकरून शिस्तबद्ध प्रमाणे कार्यालय चालेल व शेतकऱ्यांचे कामे वेळेवर होतील.
via Blogger http://ift.tt/2n6ql3c
from WordPress http://ift.tt/2moFR6G
via IFTTT
No comments:
Post a Comment