Latest News

वाशिम जिल्ह्यात युवकाची हत्त्या

वाशिम- विनोद तायडे-

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेडशी शेतशिववारात नितीन रुस्तम कांबळे वय 30 वर्ष या युवकांच्या डोक्यात  धारदार  शस्त्राने वार करून  हत्या केल्याची घटना दि 3 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली .घटनास्थळावरून मालेगाव पोलीस व पातूर पोलिसात सीमेवरून वाद झाल्याने  मुत्युदेह रात्रभर शेतात पडून राहिला. मृतकाच्या आईने पातूर पोलीस स्टेशन ला मुलाची हत्या झाल्याची फिर्याद दिल्याने पातूर पोलिसांनी 302,34 कलमान्वये गुन्ह्याची  नोंद करून  बुराण पठाण,राजू साठे या दोन संशियाताना ताब्यात घेतले तर निजाम पठाण यास मालेगाव पोलिसांनी ताब्यात  घेतले .
दि 3 फेब्रुवारीला मृतकाच्या आईने मालेगाव पोलीस स्टेशन ला दि 2 फेब्रुवारी पासून मुलगा हरविल्याची फिर्याद दिली  दि 3 फेब्रुवारीला  सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत मेडशी शेतशिववारात मोहनलाल यादव याच्या शेतातील आंब्या झाडाखाली मुत्युदेह पडला असल्याची माहिती मालेगाव पोलिसांनी   मिळताच  त्यांनी घटनास्थळी घाव घेतली त्याठिकाणी नितीन रुस्तम कांबळे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्त्या केल्याचे  प्रथमदर्शनी दिसून आले .मालेगाव पोलिसांनी घटनास्थळ मालेगाव हद्दीत येत नसल्याचे सांगून जबाबदारी  पातूर पोलिसांवर लोटली .पातूर पोलिसांनी घटनास्थानावरून वाद घालत घटनास्थळावर येण्यास नकार दिला .रात्री 11 वाजता पातूर  पोलीस मद्यधुंद अवस्थेत घटनास्थळावर दाखल झाले तोल जाऊन खुद्द पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुत्युदेहा वर दोनदा पडले असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. रात्रीला मेडशी पोलिसांसह पातूर पोलिसांनी पोबारा केल्याने नातेवाईकांना रात्रभर मुत्युदेहाजवळ थांबावे लागले .
मृतकाच्या आईने पातूर पोलीस स्टेशनला मुलाची हत्त्या पैशाच्या देवाण घेवानवरून गावातील बुराण पठाण,अकबर पठाण, निजाम पठान राजू साठे यांनी संगनमत करून केल्याची तक्रार दिल्यावरून पोलिसानी बुराण पठाण, निजाम पठाण,राजू साठे यांना ताब्यात घेतले .दि 4 फेब्रुवारीला सकाळी मुत्युदेह पातूर पोलिसांनी अकोला येथे शवविच्छेदानासाठी पाठवून दिला .सकाळी  8 वाजताच्या सुमारास वाशिम पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे,ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी घटना स्थळाला  भेट देवून शेत मालकासह तलाठी कोल्हे  यांना बोलावून घेतले तेव्हा घटनास्थळ मालेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याचे निष्पन्न झाले .मालेगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि संशियाताना ताब्यात घेण्यासाठी पातूर पोलीस स्टेशनला गाठले असता पातूर ठाणेदाराने संशयितासह माहिती देण्यास नकार देत अकोला पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने तपास वाशिम पोलीस अधिक्षकाकडे सोपविणार असल्याची सांगितल्याने मालेगाव पोलिसांना हात हलवत परतावे लागले. पातूर पोलिसांनी दुपारी 1 वाजता घटनेचा पंचनासमा केला घटनास्थळावरून काही नमुने तपासणीसाठी घेतले.सीमेवरून वाद झाल्याने त्यांनी मेडशी येथील तलाठी कार्यालय गाठत शेताचा सातबारा हस्तगत केला . मालेगाव व पातूर पोलिसांचा सीमेवरून वाद झाल्याने मृतकाच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला

via Blogger http://ift.tt/2lI4CKa




from WordPress http://ift.tt/2m85cEn
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.