Latest News

वाशीम जिल्हा माहेश्‍वरी संघटनेला विशेष पुरस्कार

वाशीम -महेंद्र महाजन =

अखिल भारतीय माहेश्‍वरी महासभेअंतर्गत येणार्‍या विदर्भ प्रादेशिक माहेश्‍वरी संघटनेची प्रथम कार्यसमितीची सभा 28 फेब्रुवारी रोजी माहेश्‍वरी भवन येथे स्व. शंकरलाल चांडक सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी मंचावर विदर्भ प्रादेशिक माहेश्‍वरी संघटनेचे अध्यक्ष मदनलाल मालपाणी, मंत्री, सि.ए. दामोदर सारडा, कोषाध्यक्ष अशोककुमार सोनी, पुर्व उपाध्यक्ष मधुसुदन सारडा, पश्‍चिम उपाध्यक्ष ऍड. अशोककुमार भंडारी, संयुक्त मंत्री पुर्व पुरुषोत्तम सारडा, प्रचारमंत्री ललित चांडक, सहमंत्री प्रा. रमन हेडा, माजी अधक्ष सज्जनसिंह मोहता, वाशीम जिल्हाध्यक्ष शेखर बंग यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम दिपप्रज्वलन, भगवान महेश पुजन व सामुहिक महेशवंदना पठनाने सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी समाजातील दिवंगत झालेल्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या प्रथम सत्रात जळगाव येथील सतिश चरखा व अमरावती येथील सि.ए. राजेश चांडक यांनी मार्गदर्शन केले. सदर सभेत वेगवेगळ्या समित्याचे विदर्भस्तरावर गठन करण्यात आले. सोबतच संघटनेची नियमावली, संघटनेचे संविधान, संघटनेच्या  योजना, समाजाकरीता वेगवेगळ्या संस्थेतर्ङ्गे राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी समाजातील गुणवंत, युपीएसपी, एमपीएससी, एमबीबीएस आदी उच्च शिक्षण क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणार्‍यांचा अभिनंदन ठराव घेेण्यात आला. सोबतच विविध राजकारणात निवडून येणार्‍या समाजातील पुढार्‍यांचाही अभिनंदन ठराव पारित करण्यात आला. वाशीम जिल्हयातून नगराध्यक्ष अशोक हेडा, स्विकृत सदस्य पुरुषोत्तम चितलांगे तथा एक्सलंस अवार्ड पुरस्कारप्राप्त गिरीष लाहोटी यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर बंग यांनी माहेश्‍वरी समाज सदैव सामाजीक कार्यात अग्रेसर असतो. समाजात संगठन गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. विदर्भस्तरीय सभेत वाशीम येथील डॉ. अशोक बंग, राजकुमार मुंदडा, पवन मंत्री, श्रीराम राठी, सुनिल गट्टाणी, निलेश सोमाणी, ढोलुराम तोष्णीवाल, आशिष लढ्ढा, सुमित चांडक, कैलास मुंदडा समवेत महिला मंडळ व विदर्भातील सर्व जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भस्तरीय सभा घेण्याचा पहिलाच बहूमान वाशीम जिल्हयाला प्राप्त झाला. सोबतच सर्वोत्कृष्ट आयोजनाबद्दल वाशीम जिल्हा माहेश्‍वरी संघटनेला विदर्भ अध्यक्ष मदनलाल मालपाणी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कैलास मुुंदडा व प्रा. कृष्णकुमार लाहोटी तथा आभार प्रा. रमण हेडा यांनी व्यक्त केले.

via Blogger http://ift.tt/2m8ww5M




from WordPress http://ift.tt/2mt6qeD
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.