वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटनेची नवीन कार्यकारणीचे गठन करण्यात येवून शपथविधी व पदग्रहण सोहळा माहेश्वरी भवन येथे उत्साहात पार पडला. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. मिनाक्षी हरिष बाहेती, तर सचिवपदी डॉ. पद्मा माणिक धुत यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीत उपाध्यक्ष सौ. किर्ती हरिष सोनी, सौ. कल्पना ललित चांडक, सौ. रेणू हुरकट, कोषाध्यक्ष सौ. लता बंग, सहसचिव सौ. निता हेडा, सौ. किर्ती मुंदडा, सौ. ज्योती छापरवाल, कार्याध्यक्ष सौ. संध्या मानधने, सौ. शिवकांता इन्नाणी, संगठनमंत्री सौ. लता बजाज, सौ. नयन मुंदडा, प्रचारमंत्री सौ. रेखा कासट तर मनोनीत सदस्य म्हणून सौ. सुनिता हेडा यांची निवड करण्यात आली. पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षपदी सौ. प्रेमा बंग तर अतिथी म्हणून सौ. सुनिता हेडा व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा सौ. मिनाक्षी बाहेती, सचिव सौ. पद्मा धुत मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दिपप्रज्वलन, भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पुजन व महेश वंदनाने करण्यात आली. महेश वंदना सौ. नम्रता मानधने, सौ. राखी गट्टाणी यांनी प्रस्तुत केली. यानंतर कु. मानसी मानधने, कु. आयुषी काबरा, कु. खुशी लटुरिया यंानी सुंदर नृत्य करुन शब्दसुमनाने पाहूण्यांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमात विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेच्या वतीने आयोजीत स्पर्धा आपली संस्कृती आपली धरोहर यामध्ये सौ. नम्रता मानधने, सौ. माया मानधने, सौ. पल्लवी जाजू, सौ. स्नेहा जाजू, सौ. किर्ती सोनी, सौ. श्वेता बियाणी, सौ. वर्षा बिर्ला, सौ. शितल गट्टाणी, सौ.रेणू लटुरिया यांनी पुरस्कार प्राप्त केला. त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
सोबतच समाजात वाढत असलेले घटस्ङ्गोटाच्या समस्या कारण आणि निवारण या विषयावर आयोजीत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सौ. नम्रता मानधने, व्दितीय सौ. अर्चना मंत्री व सौ. कोमल बंग, तृतीय सौ. रुपाली बाहेती यांनी बाजी मारली. सरप्राईज गेममध्ये प्रथम पुरस्कार सौ.अनुपमा मानधने व व्दितीय पुरस्कार सौ. लता बजाज यांना मिळाला. कार्यक्रमाचे संचालन व आभार सौ. नम्रता मानधने यांनी मानले. कार्यक्रमाला वाशीम, मालेगाव, शिरपूर, मानोरा, कारंजा, अनसिंग, मंगरुळपीर, रिसोड येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
via Blogger http://ift.tt/2mdCHWB
from WordPress http://ift.tt/2lyVRTf
via IFTTT
No comments:
Post a Comment