चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान )
पाण्याचे कुठलीही व्यवस्थापन नसल्यामुळे वाया जात असलेले पानी |
खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचे पिक कमी आले तर रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाच्या नियोजना अभावी वेळेवर पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा गहू भराच्या आतच सुकत असल्याची परिस्थिति चांदूर रेल्वे तालुक्याच्या भाग एक मधील भागात निर्माण झाली आहे.
वेळेवर पाणी मिळत नसल्याने वाळत असलेला गहु. |
सविस्तर वृत्तानुसार चांदूर भाग एक मधे रब्बी पिकांसाठी मालखेड तलावावरून पाणी मिळत असते. पाणी वाटपाच्या नियमानुसार टेल म्हणजेच सर्वात शेवटच्या शेतकऱ्यांना पाहिले पाणी द्यायचे असते. परंतु या ठिकाणी मात्र पाणि सोडणे इतकेच काम पाटबंधारे विभागाचे कर्मचारी करतात. आलेले पाणी जवळचे सर्व शेतकरी मनमर्जीने घेत असल्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांना वेळेवर पाणीच पोहचत नाही. त्यामुळे अनेक वेळा रात्रीचे जागुन ओलीत करावे लागत आहे. आतापर्यंत पाच वेळा रब्बिसाठी पाणी सोडण्यात आले पण त्याचे वेळापत्रक नाही, किती दिवसाने व किती पाणी शेतकऱ्यांना पाहिजे आहे यावरही कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांमधुन पाणी वाया जात आहे तर अनेक ठिकाणी पानी सुटल्यावरही आठ दिवस पर्यंत पाणी पोहचत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये पाण्यावरुन भांडणे निर्माण होत आहे. या पाण्याच्या व्यवस्थापनेसाठी नेमलेला रोजंदार कर्मचारी मार्जितल्या शेतकऱ्यांना पहिले पाणी देत असल्याची ओरड शेतकरी करीत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पाच वेळा तर शेवटच्या शेतकऱ्यांना केवळ चार वेळाच पाणी मिळाले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेतच या बाबीकड़े लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी व हातात आलेले गव्हाचे पिक
वाचवावे अशी शेतकऱ्यांतर्फे मागणी होत आहे.
via Blogger http://ift.tt/2mErQm4
from WordPress http://ift.tt/2lq152S
via IFTTT
No comments:
Post a Comment