आज आणि काल एसआयटीचे पथक रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये आले होते. त्यांनी सनातन संस्थेचे विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्याशी चर्चा केली. पोलीस शोध घेत असलेल्या सनातनच्या साधकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सनातन संस्थेने यापूर्वीच केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माध्यमांनीही ऐकीव बातम्यांवरून वृत्त प्रसिद्ध न करता, निःपक्षपातीपणे वास्तवाला धरून वृत्ते द्यावीत, अशी अपेक्षाही सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केली. सनातनचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास अाहे. सनातन संस्थेने यापूर्वीही तपास संस्थांना सहकार्य केले आहे, तसेच यापुढेही सहकार्य करत राहील.
via Blogger http://ift.tt/2mblT1Z
from WordPress http://ift.tt/2lf0fL1
via IFTTT
No comments:
Post a Comment