शेतक-यांच्या सिंचन वाढीसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. नदी जोड प्रकल्प त्यातीलच एक भाग आहे. या नदयांचा सिंचनासाठी उपयोग व्हावा त्या दृष्टीने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावे असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार डॉ.अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक आर राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वणीचे नगराध्यक्ष राजेंद्र बोरडे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, डॉ.नितीन व्यवहारे, विज वितरणचे अधिक्षक अभियंता विजय भटकर, उत्पादन शुल्कचे अधिक्षक पराग नवलकर आदी उपस्थित होते.
विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाचा आढावा घेतांना जिल्हयातील जास्त काम झालेले अर्धवट प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नदी जोड प्रकल्पाचा आढावा घेतांना या प्रकल्पातंर्गत शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे असे ते म्हणाले. मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचा आढावा घेतांना जुन्या व्यवसायीकांना कर्ज देतांनाच बेरोजगार युवकांना प्राधान्याने कर्ज दया असे ते म्हणाले. या योजनेतंर्गत तीनशे कोटीच्या वाटपाचे उदिष्ट ठेवा असे त्यांनी सांगितले.
धडक सिंचन व नरेगातून धडक मध्ये वर्ग करण्यात आलेल्या विहीरींचाही त्यांनी आढावा घेतला. या विहीरी तातडीने पूर्ण करुन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे. धडक मधून पूर्ण झालेल्या विहीरींना विज कनेक्शन देण्याची विशेष मोहिम विज वितरण विभागाने राबवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. विज वितरणच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दिनदयाल उपाध्याय ही योजना राबविली जात असून या योजनेतंर्गत मंजूर प्रस्तावातील कामे वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी अवैधमद्ये वाहतूक तसेच जनावरांच्या अवैध वाहतूकीचाही आढावा त्यांनी घेतला. जनावरांची वाहतूक करणा-यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकाम कामाचाही आढावा त्यांनी घेतला.
via Blogger http://ift.tt/2lZeh3H
from WordPress http://ift.tt/2nDW6Nr
via IFTTT
No comments:
Post a Comment