अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
शहराच्या महत्वाकांक्षी विकास आराखड्याला मुर्त रूप देण्याकरीता आर्थिक पाठबळ असणे गरजेचे आहे.याकरिता स्थानीक स्वराज संस्थेजवळ एक मार्ग म्हणजे मालमत्ता कर गेल्या अनेक वर्षापासून थकीत असलेल्या या कराला वसूल करण्यासाठी अचलपूर नगरपालिकेत धडक मोहीम राबवली गेली.
मुख्याधिकारी प्रदिप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर निरीक्षक डाँ.रोहन राठोड,सुनिल नेवाळे यांनी सागर महल्ले,सुशांत गाडगे,मीसे,साजीद,पुरण धांडे,मोरे व इतर कर्मचारी यांनी पोलीसांच्या मदतीने विस दिवसात १७ दुकानांना सिल करण्यात आले असून ५६,०६,७२१ रुपये अशी विक्रमी वसुली झाल्याचे सुत्राच्या माध्यमातून माहिती प्राप्त झाली आहे.करविभागाने उर्वरित थकीत करधारकांना आवाहन सुध्दा केले आहे की आपणाकडे थकीत असलेल्या कराचा भरणा करून शहराच्या विकासासाठी हातभार लावावा
via Blogger http://ift.tt/2msLHUB
from WordPress http://ift.tt/2mNXkbw
via IFTTT
No comments:
Post a Comment