सद्या सगळीकडे पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नुकतेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी प्रहार संघटनेचे अमरावती पदविधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. दीपक धोटे यांना जाहिर पाठिंबा दिल्याच्या अनुशंगाने चांदुर रेल्वे येथे प्रहार संघटना व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. चांदूर रेल्वे तालुक्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रहारला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या पाठिंब्यामुळे शिवसेना व प्रहार कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी बैठकीला प्रहारचे प्रवीन हेंडवे, चांदुर रेल्वे तालुका प्रमुख सौरभ इंगळे, राहुल चाबेकर,अक्षय बाबर तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू निंबर्ते, मोरेश्वर राजुरकर, बंडू अांबटकर, राजू मेटे, प्रकाश जयसिंगपुरे, अनूप डूबे, स्वप्निल मानकर, रोशन खंडार आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
via Blogger http://ift.tt/2jVxJMf
from WordPress http://ift.tt/2kfKZtw
via IFTTT
No comments:
Post a Comment