Latest News

३५० किल्ल्यापैकी एकाही किल्ल्याचा सत्यनारायण न घालणारा राजा म्हणजेच “शिवराय” – प्रा.पठाडे

रिसोड(रुपेश बाजड):-

 बहुजन सामाजिक सेवा संघटन  च्या वतीने सुबोध कोचिंग क्लास च्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. शालीकराम पठाडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रिसोड,प्रमुख अतिथी   विनोद खडसे जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड वाशिम, केशवराव सभांदिंडे ता. अध्यक्ष भारिप-बमंस,शेख अन्सारोद्दीन पत्रकार, सचिन देशमुख ता अध्यक्ष म.से.सं,माजी नगरसेवक शेख ख्वाजा, अलंकार खैरे शिक्षण सभापती न.प रिसोड, अर्जुनराव खरात, रवि अंभोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे  पूजन करन्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती अलंकार खैरे यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.पठाडे यांनी शिवाजी महाराजांचे विचार समानतावादि असून समाजाला उन्नतीकडे नेणारे आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे सुराज्य निर्माण करणाऱ्यांसाठी आवश्यक बाबींचा समावेश केला व राजांच्या कार्याला पुनर्जीवित केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव शेतकरी हिताचे धोरण राबविले सर्वांना योग्यतेप्रमाणे काम दिले अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य मिळविले ,चारित्र्यसंपन्न जीवन जगताना मानवी मूल्यांचा सदैव  आदर करणारे महाराज आजही प्रत्येक घरात निर्माण होण्याची गरज असून आजच्या  महिलांनी जिजाऊना आदर्श मानून मुलांना घडविण्याची गरज आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अठरापगड जातीचे मावळे उपस्थित आहेत म्हणजेच राजांना खरे अभिवादन होत आहे असे मत त्यांनी मांडले धनंजय देशमुख यांनी दोन वेळा शिवजयंती साजरी करण्याचे कटकारस्थान स्पष्ट करून सांगितले येणाऱ्या काळात 19 फेब्रुवारीलाच जयंती साजरी होईल असे सूतोवाच केले.आदील घनकर या दहा वर्षीय बालकाचे भाषण सर्वांना फार आवडले त्याचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.    प्रसंगी अन्सारोद्दीन, रवि अंभोरे, शेख ख्वाजा,डॉ इंगळे, विनोदभाऊ खडसे,केशवराव सभांदिंडे इत्यादीची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड सतीश पंडित यांनी तर आभार रुपेश पाटील बाजड यांनी मानले.    

via Blogger http://ift.tt/2lZQ1OR




from WordPress http://ift.tt/2kDsGSP
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.