परिवहन नियमांची पायमल्ली करीत फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार असल्याची माहिती ठाणेदार चंद्रशेखर कदम यांनी पत्रकाद्वारे दिली.
शहर किंवा परिसरातील दादा- बॉस इत्यदी बिरुदावली मिरवणारे खूप आहेत. ही बिरुदावली आता दुचाकींसह चारचाकींच्या नंबर प्लेट वर दिसू लागली आहेत. गेल्या काही वर्षापासून वाहनांचे नोंदणी क्रमांक मराठीत लिहिताना अक्षरांप्रमाणे आकार देऊन दादा-बाबा, भाऊ, बॉस, राजे तर कधी थेट आडनावे लिहिली जातात. तर काही जण नंबरच लिहीत नाहीत .अशा वेड्यावाकड्या अक्षरामध्ये मोटरसायकलवर नंबर प्लेट असल्यामुळे गुन्ह्यातील वाहनांचा शोध घेने कठीण होते.
नंबरप्लेट विरोधात शहर पोलीसांच्या वतीने विशेष अभियान सुरू करणार आहोत. त्यानुसार एक – दोन दिवसांत फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचे चालक अथवा मालक यांनी कारवाईचा प्रकार टाळायचा असल्यास आपापल्या वाहनांच्या नंबर प्लेट नियमानुसार तयार करून घेणे उचित ठरणार आहे.
यापुढे शहरात फॅन्सी क्रमांक असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सी.ए. कदम यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
via Blogger http://ift.tt/2lORqqg
from WordPress http://ift.tt/2lElwMG
via IFTTT
No comments:
Post a Comment