अमरावती जिल्हा परीषदेच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील तीन सर्कलच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होणार असुन त्यासाठी प्रशासकीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील घुईखेड, आमला विश्वेश्वर, पळसखेड या तीन सर्कलच्या निवडणुकीसाठी २० उमेदवार रींगणात असुन आज होणाऱ्या मतदानासाठी निवडणुक विभागाकडुन मतदानासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. मतदान प्रक्रीया योग्य प्रकारे पार पडावी व मतदारांना मतदान करतेवेळी कोणताही त्रास होऊ नये यासाठी घुईखेड सर्कलमध्ये २८ मतदान केंद्रांवर ११२ कर्मचारी व २८ पोलीस कर्मचारी, आमला विश्वेश्वर सर्कलमध्ये २७ मतदान केंद्रावर १०८ कर्मचारी व २७ पोलीस कर्मचारी, पळसखेड सर्कलमध्ये २६ मतदान केंद्रांवर १०२ कर्मचारी व २६ पोलीस कर्मचारी असे एकुन ३२२ कर्मचारी व ८१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रक्रीयेत ९ झोनल अधिकारी, ८ बस व ९ जिप वाहनांचाही समावेश राहणार आहे. सर्व मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली असुन अंध- अपंगांना मतदानाकरीता प्राधान्य देण्यात येणार आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान होणार आहे. मतदार जनजागृतीसाठी निवडणुक विभागाकडुन प्रत्येक सर्कलमध्ये रैली सुध्दा काढण्यात आली होती. मतमोजनी २३ फेब्रुवारीला स्थानिक तहसिल कार्यालयात सकाळी १० वाजतापासुन होणार असल्याची माहिती निवडणुक विभागाकडुन देण्यात आली आहे. या संपुर्ण प्रक्रियेत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडेसह तहसिलदार राजगडकर, नायब तहसिलदार बढिये, पळसकर व इतर कर्मचारी काम पाहत आहे..
via Blogger http://ift.tt/2lgaYTY
from WordPress http://ift.tt/2l1HSVL
via IFTTT
No comments:
Post a Comment