–
चांदुर रेल्वे येथील बाजार समितीमधील गोदामामध्ये साठवणुकीसाठी जागा
नसल्याचे कारण पुढे करीत नाफेडने शेतकर्यांची तूर खरेदी करणे बंद केले
आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी आपला शेतमाल घेवून बाजार समितीसमोर ताटकळत
असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र आतापर्यंत खरेदी केलेली तुर ही केवळ
व्यापाऱ्यांचीच असुन आता येत असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला नाफेड
नाकारत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.पावसाने सरासरी ओलांडत जोरदार हजेरीलावल्याने सुखावलेल्या शेतकऱ्यांनी
मोठय़ा प्रमाणावर तूर पिकाचे उत्पादनघेतले आहे. पाचवीला पुजलेल्या दुष्काळाने
कोंडीत सापडलेल्या बळीराजाला तुरीच्या उत्पादनातून आर्थिक फायदा होईल, असे वाटत असतानाच या वर्षी
शासनाने कमी भाव दिला आहे. आधीच भाव नाही, त्यातच आता शासनाने खरेदी
बंद करत ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ दिल्या आहेत. आवक वाढल्याने
सर्वच गोदामे भरली असून, नाफेडने तूर खरेदी बंद केल्याचे समजते.
कृषी उत्पन्न बाजार
समितींकडून नाफेडअंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती. बाजार समितीच्या गोडावुन परिसरात तुर उत्पादक
शेतक-यांच्या तुरीला योग्य भाव मिळावा या हेतुने शहरात 28 डिसेंबर पासुन
5050 रुपये हमी भावाने शासनाकडुन तुर खरेदी सुरु केले. केंद्र शासनाने
एकीकडे शेतक-याबद्दल सहानुभूति दाखवत हमी भावाने तुर खरेदी करण्याचा निर्णय
घेतला आसला तरी दुसरीकडे तुरीच्या पात्रतेविषयी जाचक अटी घालुन
शेतक-यांच्या हातावर तुरी दिल्या असेच म्हणावे लागत आहे. भारतीय खाद्य निगम
तुर उत्पादक शेतक-याकडुन तुर खरेदी करत असतांना जाचक अटी लादत आहे.यात
हिरवा व अपरिपक्व 3%,क्षतीग्रत 3.5%,भुंगा लागलेला 3.5%,डाळीचे प्रमाण
3.5%,आद्रता 12%,काडीकचरा 2%,मिश्रपदार्थ 3% बाह्यखाद्यघटक 1%आदीनुसार
शेतक-यांच्या तुरीत घटक असतील तर सरासरी दर्जेदार तुर (FAQ) म्हणुन
पात्रधरण्यात येइल मात्र या उलट वरील आठ घटकापैकी एका घटकाचे प्रमाण जरी
अधीक असेल तरी देखील तुर अपात्र ठरविण्यात येते. तुर पात्र अपात्रतेच्या
जाचक अटीच्या माध्यमातुन जातांना शेतक-यांची पिळवणुक होत आहे. याशिवाय
शेतकऱ्यांच्या मालाला चाळणी असणे सुध्दा आवश्यक होते. याउलट चांदुर
रेल्वे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत हजारो क्विंटल तुर
विना जाचक अटीची केवळ व्यापाऱ्यांचीच खरेदी करण्यात आली असुन नाफेड
कर्मचारी व स्थानिक व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला अटी लागत असुन व्यापाऱ्यांच्या हजारो क्विंटल माल
नाफेडने विना अटी खरेदी करण्यात आला आहे. तसेच 28 डिसेंबर पासुन नाफेडने
तुर खरेदी सुरू केली असतांना तेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत यायचा
होता. यावेळी स्थानिक व्यापारी व नाफेड कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतने
व्यापाऱ्यांचे हजारो क्विंटल माल नाफेडने खरेदी करून गोडाऊन फुल्ल केले.
आणि आता शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत आला असता त्यांचा माल नाकारण्यात
येत आहे. त्यामुळे नाफेडच्या खरेदीत व्यापाऱ्यांची बल्ले- बल्ले झाली असुन
शेतकऱ्यांचे मरण होत असल्याची प्रतिक्रीया टेंभुर्णी येथील युवा शेतकरी
अंकुश खाडे यांच्यासह इतरांनी व्यक्त केली.
नाफेडने तुर खरेदी बंद करताच व्यापाऱ्यांनी पुन्हा संधीचे सोने करीत गरजु
शेतकऱ्यांची तुर केवळ 3800-4000 रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली
आहे. यावरून नाफेड कर्मचारी व व्यापाऱ्यांमध्ये मिलीभगत दिसत असुन
यामध्ये शेतकऱ्यांचा मात्र जीव जात आहे.
2) व्यापाऱ्यांच्या मनमानीला ब्रेक लावावा
स्थानिक बाजार समितीत सोयाबीन, तुर, चना, मुंग, उडीद आदींची खरेदी करीत
असतांना बोलीच्या वेळी सर्व व्यापारी शेतकऱ्याच्या मालाजवळ उभे न राहता
इतरत्र फिरतात. बोलीच्या वेळी केवळ १-२ व्यापारी उभे राहत असल्याने ते कमी
भावात घेवुन घेतात. व्यापाऱ्यांच्या अशा मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचा
माल कमी पैशांत विकला जात आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने
व्यापाऱ्यांच्या मनमानीला ब्रेक लावण्याचीही मागणी जोर धरत आहे..
via Blogger http://ift.tt/2m7X70r
from WordPress http://ift.tt/2kUEDyy
via IFTTT
No comments:
Post a Comment