चंद्रपुर-
19/2/2017 जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम . डी. सिह यांनी नुकताच वरोरा तालुक्यातील मांढेळी व नागरी या गावातील धडक सिंचन योजने अंतर्गत पुर्ण झालेल्या विहिरीची पाहणी केली . कोरडवाहु शेती समृध्द करण्याकरिता धडक सिचंन योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यायला हवा.ही योजना शेती समृध्द करण्याकरिता शेतक-यांना आधार ठरणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिह यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील गरिब शेतक-यांची शेती सिंचनयुक्त व्हावी म्हणुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त सिंचन विहिरी निर्माण करुन, शेती सिंचना खाली आल्यास शेतक-यांना खरा आधार होणार असुन, याद्वारा शेतीमधुन जास्तीत जास्त उत्पादन काढता येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह आपल्या कामाच्या व्यस्ततेतुन वेळ काढुन जिल्ह्यात चालु असलेल्या धडक सिंचन योजनेच्या विहिरी बांधकामास भेट देवुन लाभार्थ्यांशी प्रत्येक्ष चर्चा करुन , लाभार्थ्यांना येणा-या अडचणी जाणुन घेतात. या शिवाय लाभार्थ्यांना निधी वेळेत देण्याच्याही सुचना केल्या जात आहे. नुकताच वरोरा तालुक्यातील माढेळी येथिल उत्तम वादाफ़ळे, नागरी येथिल नंदाताई भलमे यांच्या शेतीत जावुन पुर्ण झालेल्या सिंचन विहिरीची पाहणी केली. सिंचन विहिरीचा भविष्यात कसा फ़ायदा करुन घेता येईल याबाबत आस्तेने चर्चा करुन माहिती जाणुन घेतली. त्याच ठिकाणी संबधीत दोन्ही लाभार्थ्यांना एम . डी. सिह यांच्या हस्ते सिंचन विहिरीच्या कामाचा निधीचा धनादेश वितरित करण्यात आला.
वनोजा यागावात मुख्य कार्यकारी अधिकारी एम . डी. सिह शौचालयाचे भुमीपुजन व मागेल त्याला शौचालय या अभिनव उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारा वरोरा पंचायत समिती अंतर्गत एक टोल फ़्रि नंबर व व्हाट्सअप नंबर जाहिर केला असुन , या नंबर संपर्क केला असता त्वरित लाभार्थ्यास शौचालयाचा लाभ शासनाच्या विविध योजनामधुन कसा घेता येईल या विषयी घरी येवुन माहिती देण्याची उपाय योजना निर्माण करण्यात आली आहे. हा उपक्रम परिणाम कारक असुन, सर्व पंचायत समिती अंतर्गत अभिनव उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सिह यावेळी म्हणाले. या सोबतच वधंली यागावातील जिल्हापरिषद शाळेमध्ये लोकसहभागातुन निर्माण केलेल्या डिजिटल शाळा उपक्रमाचे उदघाटन करुन मुख्य कार्यकारी अधिकारी एम . डी. सिह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता रविंद्र मोहिते, वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश यादव, सहाय्यक गटविकास अधिकारी बोबडे यावेळी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2m13Ix0
from WordPress http://ift.tt/2m1bPth
via IFTTT
No comments:
Post a Comment