Latest News

वरिष्ठांनी पुनर्चौकशी केल्यास चांदुर रेल्वे पोलीसांवर निलंबनाची टांगती तलवार ? पत्रकारावर भ्याड हल्ला प्रकरण

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –

स्थानिक सी.सी.एन. न्युज चॅनल चे संचालक तथा अखील भारतीय ग्रामीण पत्रकार
संघाचे माजी अध्यक्ष अमोल विष्णूआप्पा गवळी कार्यालयामध्ये कामकाज करत
असताना काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या 10 ते 12 लोकांनी अमोल गवळी
यांच्यावर लोखंडी पाईप,काचेचे बॉटल,व फायटर ने 31 जानेवारी रोजी प्राणघातक
हल्ला केला होता. या प्रकरणामध्ये हल्ला करणारे अनेक आरोपी फरारच असुन उलट
गवळी बंधुवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ठाणेदार, एक सहाय्यक
ठाणेदारासह पोलीस शिपायांचे हात चांगलेच ओले झाल्याची चर्चा शहरात अजुनही
सुरूच आहे. त्यामुळे वरिष्ठांनी पुनर्चौकशी केल्यास चांदुर रेल्वे
पोलीसांवर निलंबनाची टांगती तलवार येऊ शकते.

            सविस्तर वृत्त असे की , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे
चांदुर रेल्वे माजी तालुकाध्यक्ष तथा स्थानिक सी.सी.एन. न्युज चॅनलचे
संचालक अमोल गवळी नेहमी प्रमाणे शनिवारी (ता. 31)सकाळी कार्यालयात बसले
असतांना 10 ते 15 गुंड प्रवृतीच्या लोकांनी कार्यालयात घुसून त्यांच्या वर
हल्ला चढविला होता. त्याचवेळी कार्यालयात बसलेले अंकुश खाडे व सागर गावंडे
या दोघांवरही हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर हे कॉलिस गाडी (एमएचि
३१/एएच०६३४)मधून व मोटार सायकल वर आले होते. अमोल गवळी यांना मारहाण होताना
दिसताच धावून आलेल्या नागरिकांनी हल्ले खोरांना परतावून लावले, नागरिकांची
गर्दी वाढतच हल्ले खोरांनी आपला घटना स्थळावरून पळ काढला होता. या
हल्ल्यात विशेष म्हणजे हल्लेखोरांसह अमोल, गवळी, नितीन गवळी व इतर
सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा केवळ
हल्लेखोरांच्याच सांगण्यावरून नोंदविण्यात आला. गवळी बंधुंवर यापहिले
कोणतेही गुन्हे दाखल नव्हते. हे खोटे गुन्हे पोलीसांचे हात ओले झाल्यावर
केल्याची शहरात जोरदार चर्चा होती. याप्रकरणाची वरीष्ठांनी  पुनर्चौकशी
केल्यास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमधील भ्रष्ट ठाणेदार, एक सहाय्यक
ठाणेदार तसेच काही पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
नाकारता येत नाही.

पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात लक्ष देण्याची गरज

जिल्हाचे ग्रामिण पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांची जबाबदार व कर्तव्यदक्ष
अधिकारी म्हणुन ओळख आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर
हल्ला होत असेल न पैशांच्या जोरावर उलट पत्रकारांवरच खोटे गुन्हे दाखल होने
ही निंदणीय बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून बेजबाबदार
पोलीसांवर निलंबनाची कारवाई सुध्दा करणे गरजेचे आहे.

via Blogger http://ift.tt/2l3wsRk




from WordPress http://ift.tt/2kUzRRJ
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.