चांदूर रेल्वे तालुक्यातील तीन जिल्हा परिषद सर्कल करीता आज (ता.२१) ८१ मतदान केंद्रावर घेण्यात आलेले मतदान शांततेत पार पडले. या निवडणूकीत ६२.३५ टक्के मतदार झाले. आमला विश्वेश्वर जि.प.सर्कलमध्ये ६०.६९ टक्के मतदान झाले तर पळसखेड जि.प.सर्कलमध्ये ६२.९६ टक्के आणि घुईखेड जि.प.सर्कलमध्ये ६३.४२ टक्के मतदान झाले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, पळसखेड व घुईखेड जि.प.सर्कलच्या सार्वत्रिक निवडणूकीत २० उमेदवारांचे राजकिय भाग्य ‘ एव्हीएम मशीन ‘ मध्ये बंद झाले आहे. या निवडणूकीत आमला विश्वेश्वर जिल्हा परिषद सर्कल(अनुसूचित जाती महिला)मध्ये अॅड.सुनिता प्रभाकर भगत (जनता दल सेक्युलर), आशा सुरेंद्र भोगे (शिवसेना), विजया राजेश पखाले (भाजप), मायावती अशोक भावे (राष्ट्रवादी काँग्रेस), संघमित्रा आनंद भगत (बहुजन समाज पार्टी), रंजना हरिभाऊ गवई (काँग्रेस) असे एकूण सहा उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाले. तर पळसखेड जि.प.सर्कल (अनुसूचित जाती) मधून पंजाब झाबाजी राऊत (भाजप), नितीन उमाकांत गोंडाणे (काँग्रेस), प्रशांत ओंकार पाटील (भारिप-बमसं), धनराज किसन शेंडे (राष्ट्रवादी काँगे्रस), चंद्रकांत मारोतराव खडसे (युवा स्वाभिमान पक्ष), देवराव नथ्थुजी करूणाधन (अपक्ष), पुष्पा मधुकर तायडे (शिवसेना) असे सात उमेदवारांचे भाग्य ‘ ईव्हीम ‘मध्ये बंद झाले आहे. तसेच घुईखेड जि.प.सर्कल (सर्वसाधारण महिला) मध्ये सरीता गजानन शहाडे (जनता दल सेक्युलर), रतिका विशाल देशमुख (शिवसेना), सिमा प्रशांत देशमुख (भाजप), राधीका प्रविण घुईखेडकर (काँग्रेस), मनिषा मुकुल परगणे (भारीप-बमसं), प्रेमा हरिभाऊ ठाकरे (अपक्ष) व संगीता देविदास वानखडे (भारतीय कम्युनिस्ट पार्टी) असे सात उमेदवारांचे राजकिय भाग्य ‘ ईव्हीएम ‘मध्ये बंद झाले. आमला विश्वेश्वर जि.प.सर्कल मध्ये २६ मतदान केंद्र , पळसखेड जि.प.सर्कलमध्ये २६ मतदान केंद्र व घुईखेड जि.प.सर्कलमध्ये २९ मतदान वेंâद्र असे एकूण ८१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. या निवडणूकीसाठी ९ झोनल अधिकारी व ३६० मतदान अधिकारी, ३० महिला कर्मचारी व १०५ पोलीसांनी महत्वाची भूमिका बजावली. मतदान प्रकिया संपल्यानंतर ‘ ईव्हीएम ‘ मशीन व मतदान साहित्य एसडीओ कार्यालयात जमा केल्यानंतर सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्याना मसाले भात व कढीचे जेवन देण्यात आले. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे , सहा.निवडणूक अधिकारी म्हणुन तहसीलदार बी.ए.राजगडकर व ना.तहसीलदार दिनेश बढिये, प्रभाकर पळसकर, श्रीकांत विसपुते, श्री देशमुख यांनी काम पाहिले.
राखीव संवर्गामूळे जि.प.सर्कलमध्ये दिसला निरूत्साह
चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर जि.प.सर्कल अनुसूचित जाती महिला व पळसखेड अनुसूचित जाती करीता राखीव आहे.तर घुईखेड जि.प.सर्कल सर्वसाधारण महिला करीता राखीव आहे.त्यामूळे चांदूर रेल्वे तालुक्यातील तीन जि.प.सर्कलमधील सर्वसाधारण मतदारामध्ये मतदान करण्यासाठी निरूत्साह दिसुन आला.
via Blogger http://ift.tt/2lrbJrK
from WordPress http://ift.tt/2kI4Rck
via IFTTT
No comments:
Post a Comment