Latest News

निवडणुक मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पाडा – मुख्य निवडणूक अधिकारी श्री सचिंद्र प्रताप सिंह

* महसुल व पोलीस अधिकाऱ्यांकडून मतमोजणीचा आढावा
* मतमोजणी केंद्रावर अत्यावश्यक सुविधा उपलब्धतेचे निर्देश


यवतमाळ-

 जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक
जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडली. दिनांक 23 फेब्रवारी रोजी होणारी
मतमोजणीची प्रक्रीया ही उत्तमपणे पार पाडा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणुक अधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.

महसुल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय
अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व उपविभागीय पोलीस
अधिकाऱ्यांकडून निवडणुक मतमोजणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार सिंगला, पोलीस
अधीक्षक एस.राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, निवडणुक
उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे
यांच्यासह महसुल व पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मतमोजणीची प्रक्रीया उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष
पारदर्शकपणे आणि शांततेत पार पाडायची आहे. मतमोजणीसाठी लागणारी आवश्यक
तयारी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी आधीच करून ठेवावी. वेळेवर कोणत्याही
प्रकारची अडचण जाणवणार नाही याकडे लक्ष दिले जावे. मतमोजणी केंद्रावर निकाल
जाणून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. या नागरिकांना वेळोवेळी लाऊड
स्पिकरद्वारे मतमोजणीची स्थिती कळविण्यात यावी.
मतमोजणी केंद्र किंवा
केंद्राबाहेर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही यासाठी पुरेसा पोलीस
बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलीस विभागास दिले.

via Blogger http://ift.tt/2lCbHj8




from WordPress http://ift.tt/2ldnW4V
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.