तालुक्यातील दिघी (कोल्हे) येथील एका शेतकऱ्याच्या तुरीच्या गंजीला आग
लागुन अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुुपारी १२.३०
वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्तमाहितीनुसार, येथुन जवळच असलेल्या दिघी (कोल्हे) येथील
शेतकरी प्रकाश देविदासपंत नांदुरकर (वय- ६७) यांचे २० एकर शेत गावाजवळच
आहे. शेतात तुर सोंगुन १३००-१४०० पेंडीची गंजी लावली होती. यामधुन त्यांना
५०-५५ पोते तुर होण्याची शक्यता होती. अशातच सोमवारी दुपारी १२.३० च्या
दरम्यान शेतात वानरांचा त्रास होत होता. वानरे हकलविण्याकरीता आंब्याच्या
झाडाच्या बाजुला एक फटाका लावला असता याच फटाक्यातुन अनावधाने तुरीच्या
गंजीला आग लागली. आग लागताच चांदुर रेल्वे नगर परीषदेच्या अग्निशमन दलाच्या
गाडीला पाचारण करण्यात आले. मात्र यामध्ये तुरीची गंजी पुर्णत: जळुन खाक
झाली. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास ३ लाखांचे नुकसान झाले आहे.
शासनाच्यावतीने नुकसान भरपाईची मागणी प्रकाश नांदुरकर यांनी केली आहे.
via Blogger http://ift.tt/2lCcoZu
from WordPress http://ift.tt/2m41eh8
via IFTTT
No comments:
Post a Comment