श्रीराम मंदिर निर्माणसाठी विशाल “धर्मसभा”
बजरंग दलाचे आयोजन
अमरावती / सुरज देवहाते –
” श्री राम युवा सेना “चे संस्थापक आणी भाग्यनगर येथील भाजपचे आमदार
श्री राजासिंह ठाकूर यांची तोफ उद्या नांदगावपेठ मध्ये धडाडणार आहे. रामजन्मभूमी अयोध्या येथील प्रलंबित असलेला श्रीराम मंदिराचा मुद्दा उद्या नांदगावपेठ मध्ये त्यांचा माध्यमातून या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हि धर्मसभा विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दल यांचा माध्यमातून ठेवण्यात आली आहे. उद्या २७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता नांदगाव मधील शिवाजी चौकातील ग्रामपंचायत पटांगणात या विशाल धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशात हिंदुत्ववादि आमदार म्हणून ओळख असलेले भाग्यनगर येथील श्री राजसिंह ठाकूर राम मंदिरनिर्माणासाठी आवाहन करणार असून संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्ये व समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्ये व पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत.
via Blogger http://ift.tt/2mqn5w3
from WordPress http://ift.tt/2mqrT4F
via IFTTT
No comments:
Post a Comment