Latest News

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

पनवेल –
 शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्‍या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्‍चात्त्य विकृती वाढत आहे. आई-बाबा शब्दांची जागा आता मम्मी-डॅडी या शब्दांनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करूया; परंतु आम्ही फक्त वर्षातून एकत्र न येता प्रतिदिन एकमेकांना भेटूया आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. सिद्धी करवले, तळोजा (ता. पनवेल) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी रणरागिणीच्या सौ. नंदिनी सुर्वे म्हणाल्या, आजची पिढी चित्रपटांच्या मायावी जाळेत फसत आहे. लव्ह जिहादचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. चित्रपटांच्या माध्यमातून इस्लामीकरण चालू आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. करिना आणि सैफअली खान यांच्या मुलाचे नाव तैमुर ठेवण्यात आले आहे. ज्या तैमुरने हिंदूवर अनन्वित अत्याचार केले, त्यांचा आदर्श नवीन पिढीसमोर काय ठेवणार ?
तळोजा मजकूर येथील शिवप्रेमी आणि स्वराज मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री. गुरूनाथ मुंबईकर यांनी या सभेचे आयोजन केले होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सुनेला डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात तलवार भेट दिली. या सभेला शिवसेना तालुकाअध्यक्ष श्री. रामदास दादा पाटील, पिसार्वे गावचे सरपंच श्री. संतोष धर्मा म्हात्रे, श्री. दिनेशशेठ केणी, करवले येथील ग्रामपंचायत श्री. वासुदेव पाटील, घोट येथील श्री. ज्ञानेश्‍वर पाटील आणि श्री. बाळकृष्ण दारावरकर, तळोजे येथील माजी सरपंच श्री. खोबाजी पाटील, श्री. रघुनाथ पाटील, श्री. जगन्नाथ बुवा मढवी, श्री. मंगेश नाना मुंबईकर, माजी सरपंच श्री. लहू नाना पाटील आणि श्री. गुरुनाथ मुंबईकर उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2lrq0WW




from WordPress http://ift.tt/2mnj6jf
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.