मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आज रायगड किल्ल्यावर शिवछत्रपतींना अभिवादन करुन त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. पारदर्शिता आणि सुशासन हा विकासाचा मूलमंत्र आम्हाला छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. त्यांनी दाखविलेल्या मार्ग़ावर आम्ही वाटचाल करतो आहोत. त्यामुळेच आम्हाला राज्यात चांगले यश मिळाले. यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू. त्यातून समाजातील अंतिम माणसापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रतिज्ञेचा मी आज पुनरूच्चार करतो. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेजी, मंत्री सर्वश्री चंद्रकांतदादा पाटील, सुधीरभाऊ मुनगंटीवार, विनोद तावडेजी, आशिष शेलार उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2lGee9O
from WordPress http://ift.tt/2kWkJrY
via IFTTT
No comments:
Post a Comment