तालुक्यातील पार्डी टकमोर येथे शिवजयंती निमीत्त छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था पार्डी टकमोर द्वारा व वाशिम जिल्हा ऍथलॅटिक्स संघटनेच्या मान्यतेनुसार भव्य खुली व शालेय मिनी मॅराथॉन स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये एकुण चार खुल्या व शालेय गटामध्ये राज्य, राष्ट्रीय व अंातराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वाशिम, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा अशा पाच जिल्ह्यातील मिळून एकुण 1325 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
सदर स्पर्धेच्या दरम्यान षालेय मुलीच्या गटाच्या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी तर शालेय मुलांच्या गटाचे उद्घाटन तहसिलदार बळवंत अरखराव यांनी, पुरूष खुल्या गटाचे उद्घाटन ग्रामीणचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांनी तर जेष्ठ नागरीक गटाच्या स्पर्धेचे हिरवी झेंडी दाखवुन उद्घाटन केले. सदर स्पर्धेदरम्यान क्रांती डोंबे, बळवंत अरखराव यांचा संत गाडगे बाबा कार्यगौरव पुरस्कार संस्थेच्या वतीने देण्यात आला. तसेच सुनिल आंबुलकर यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत ग्रामीण पो.स्टे. ला आय. एस. ओ. दर्जा मिळवुन दिल्याबद्दल संत गाडगेबाबा कार्यगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेदरम्यान समाजप्रबोधनकर डिगांबर घोडके व संघ गांधरीकर यांनी खेळाचे, स्वच्छतेचे, बेटी बचाव बेटीे पढाव व समाज प्रबोधनकर गितांच्या माध्यमातुन खेळाडू व ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवुन दिले. सोबतच स्पर्धेदरम्यान किशोर कांबळे व सुरेश उगले यांनी शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर व सामान्य ज्ञानावर आधारीत चालता बोलता कार्यक्रम घेऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी चेतन ऑकेस्ट्रा संस्थेच्या वतीने दिव्यांग चेतन व सहकार्यांनी शिवचरित्रावर व्याख्यान केले.
स्पर्धेतील यशस्वी एकुण चार गटातील पुरूष खुला गटामध्ये प्रथम क्रमांक अन्सार दर्गिवाले, द्वितीय आशिष सपकाळ, तृतीय किशोर खडसे अकोला, चतुर्थ सचिन नवघरे, शालेय गट मुलींमधून प्रथम क्रमांक व उमा वाणी द्वितीय क्रमांक वैष्णवी आहेवार, तृतीय गायत्री चौधरी, चतुर्थ कविता घोडके, शालेय गट मुलामधुन प्रथम संघर्ष खिल्लारे, द्वितीय विशाल इंगळे, तृतीय सचिन खोरणे, चतुर्थ किसन ठाकरे व जेष्ठ नागरीक गटामधील प्रथम क्रमांक संतोष गिरी, द्वितीय भास्कर कांबळे, तृतीय केशव वाणी, चतुर्थ महादेव कांबळे यांनी पटकावला. सर्व विजयी स्पर्धकांचा क्रांती डोंबे, बळवंत अरखराव व सुनिल आंबुलकर यांच्या हस्ते रोख पारीतोषीक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शेवटी मनोगतपर भाषणामध्ये क्रांती डोंबे, बळवंत अरखराव व सुनिल आंबुलकर ठाणेदार यांनी संस्थेच्या नियोजनबध्द व शिस्तबध्द कार्यक्रमाचे कौतुक केले. या स्पर्धेमध्ये मुलींनी सुध्दा सहभाग घेतला होता. त्यामुळे खेळामध्ये मुलीचा सहभाग वाढण्यास मदत होईल व पार्डी टकमोर सारख्या ग्रामीण भागातील खेळाडू एक दिवस आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक करतील. असा नियोजनबध्द व शिस्तबध्द व स्तुत्य उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण देवळे यांनी आयोजीत केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले व असेच उपक्रम आयोजीत करण्यास प्रोत्साहन दिले. सदर स्पर्धेकरीता रामेश्वर ढोबळे, राजुभाऊ चौधरी, सरपंचा वेणुताई चौधरी, उपसरपंच गणेश चौधरी, माजी सरपंच गौतम कांबळे, सचिव अरविंद पडघाण, सुरेश उगले, निळकंठ चौधरी, मोहन चौधरी, हरिश चौधरी, मनोहर चौधरी, बंडू चौधरी, विजय चौधरी, सोपान देवळे, प्रल्हाद देवळे, डॉ. विजय देवळे, शाम देवळे, मोहन देवळे, सखाराम ढोबळे, ज्ञानदेव भालेराव, मुरलीधर चौधरी, किशोर चौधरी, पुरूषोत्तम चौधरी, मोहन वसंता चौधरी, रविभाऊ चौधरी, चेतन शिंदे, विजय चौधरी, प्रविण कांबळे, भास्कर कांबळे, रवि गो. चौधरी, प्रविण कांबळे, संजय चौधरी, शांतीराम चौधरी, प्रशांत उगले, सागर देवळे, उमेश देवळे, करण देवळे, विजय उगले तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र पार्डी टकमोर, मॅराथॉन समिती, ग्र्राम स्वच्छता गृप व समस्त गावकरी मंडळींचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या यशस्वितेकरीता दिलेल्या सहकार्याबद्दल स्पर्धेचे आयोजक लक्ष्मण देवळे यांनी सर्वाचे आभार मानले.
via Blogger http://ift.tt/2ld0BwV
from WordPress http://ift.tt/2kZzkTs
via IFTTT
No comments:
Post a Comment