18/2/2017 राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथिल जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत लोकसहभागातुन डिजिटल शाळा उपक्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असुन, नुकतेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांच्या हस्ते डिजिटल शाळा उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी निवड पास होवुन चालणार नसुन, शिक्षणाची आवड व जिद्द निर्माण करुन, शिक्षणाच्या स्पर्धेत उतरुन, प्रत्येकानी प्रथम येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्पर्धेतुनच खरा शॅक्षणिक विकास होत असतो . असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांनी यावेळी केले.
विहिरगाव येथे लोकसहभागातुन एन्ड्राईड टिव्हि संच खरेदी करुन ,शाळेत डिजिटल शाळा उपक्रम निर्माण केला आहे. याद्वारा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन , सोप्या पध्दतीने शिकविण्यास मदत होते. खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन डिजिटल शाळा उपक्रमा विषयी माहिती जाणुन घेतली. विद्यार्थ्यांना या उपक्रमापासुन शॅक्षणिक फ़ायदा कसे होतात .याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करुन माहिती देण्यात आली. प्रत्येक्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्गात येवुन विद्यार्थ्याशी संवाद साधत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले होते. एका विद्यार्थिनीला सिह यांनी स्वतःची पेन देवुन सन्मानित केले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता रविन्द्र मोहिते, राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, सहाय्यक गटविकास अधिकारी पानबुडे, स्वच्छ भारत मिशनचे आयईसी कृष्णकांत खानझोडे, साजिद निजामी, मुख्याध्यापक एन आर बोबाटे, सरपंच सौ. प्रतिभा करमनकर, उपसरपंच इर्शाद वहिद शेख शाळेचे सर्व शिक्षकवृन्द यावेळी उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2mf9qXN
from WordPress http://ift.tt/2m4PJTC
via IFTTT
No comments:
Post a Comment