Latest News

शिवसेनेच्या तालुक्यातील सर्कलनिहाय नियुक्त्या जाहीर

वाशीम – महेंद्र महाजन /-


शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच वाशीम जिल्हा संपर्कप्रमुख विश्‍वनाथ नेरुळकर, खासदार भावनाताई गवळी, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील यांनी वाशीम तालुक्यातील अडोळी व उकळी सर्कलमधील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये अडोळी सर्कलप्रमुख म्हणून दिपक भागवत इढोळे, उपसर्कलप्रमुख मनोज देवराव निर्मळे, संजय तुकाराम सोळंके यांच्यावर पदाचा कार्यभार सोपविला. तसेच प्रल्हाद संपत गावंडे यांच्यावर उकळीपेन सर्कलप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. खासदारांचे जनसंपर्क कार्यालय जनशिक्षण संस्थान येथे सोमवार, 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, उपतालुकाप्रमुख गजानन इढोळे, निलेश पेंढारकर  यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले

via Blogger http://ift.tt/2m6PWrW




from WordPress http://ift.tt/2m1X0WG
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.