Latest News

मनपाचे शिलकी अर्थसंकल्प सादर

मोईन खाण / परभणी –

परभणी शहर महानगरपालिकेच्य सन 2017-2018 चे अर्थसंकल्प सादर. स्थायी समिती सभापती बाळासाहेब बुलबुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी आयुक्त राहुल रेखावार, उपायुक्त तथा मुख्यलेखाधिकारी अनिल गिते, नगरसचिव चंद्रकांत पवार यांच्या उपस्थितीमध्ये अर्थसंकल्प आयुक्तांनी सभापती यांच्याकडे सादर केला. सभापती बाळासाहेब बुलबुले यांनी अर्थसंकल्प सभागृहासमोर ठेवण्यात आला. सभागृहाने एक मताने मंजुरी दिली. महापालिका अधिनियम 1949 चे कलम 95 अन्वये मी सन-2016-17 सुधारीत व सन- 2017-18 अर्थिक वर्षाचे परभणी शहर महानगरपालिका वार्षीक अंदाज पत्रक स्थायी समिती समोर सादर केला. सन-2016-17 चे सुधारीत व 2017-18 चे जमा व खर्चाचे अंदाजपत्रक सुरूवातीच्या शिल्लकासह सादर केले आहे. मागील वर्षी सन-2016-17 चे वार्षिक अंदाज पत्रक एकुण जमा रू. 334.40 कोटी, रू

 334.29 कोटीचा खर्च व रू. 11.79 लख शिल्लकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले होते.

मा. सभागृहासमोर सन-2016-17 च्या सुधारीत अंदाजपत्रकात एकुण महसूली जमा रू. 68.01 कोटी असून भांडवल जमा रू. 87.58 कोटी  आहे सुरूवातीची शिल्लक रू. 66.89 कोटीसह एकूण जमा रू. 321.08 कोटी आहे.सन 2016-17 च्या सुधारीत अंदाजपत्रकात एकूण महसूली खर्च रू. 67.10 कोटी असून भूंडवली खर्च रू. 132.86 कोटी आहे. अखेरची शिल्लक रू. 20.26 कोटी असून प्रशासनाकडून विकासकामे व योजनेच्या खर्चाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मार्च 2017 पर्यंत योजनेचा खर्च होईल या दृष्टीने प्रशासन कार्यवाही करीत आहे.

सन 2016-17 मध्ये अंदाजपत्रकात प्रस्तावीत केलेला निधी या आर्थिक वर्षात प्राप्त न झाल्यामुळे सन 2016-17 चे सुधारीत अंदाजपत्रक कमी रक्कमेचे झाले आहे प्राप्त न झालेल्या महत्वाच्या योजना व निधी खालील प्रमाणे आहे.

सभागृहामध्ये अर्थसंकल्पा संदर्भात सौ. अश्‍विनी वाकोडकर, उदय देशमुख, गणपत डहाळे, सुनिल देशमुख, गणेश देशमुख, विजय धरणे यांनी अभिनंदन अर्थसंकल्पास मंजुरी दिली.या अर्थसकल्पामध्ये मनपा फंडात वाढ करून द्यावी. तसेच सलॅप टाकणेसाठी   अर्थसंकल्पात तरतुद करा. सौ. आश्‍विनताई वाकोडकर यांनी घर पट्टी व नळ पट्टी शासकीय पध्दीने वसुल करूनका व घरपट्टी व्याज लावू नका. शंकर नगर  खानापूर या परिसरात बर्‍याच वर्षापासून नळाला पाणी येत. उदय देशमुख यांनी अर्थसंकल्पात एल.बी.टी. उर्वरीत वसूल होईलका? अर्थसंकल्प 2016-17 अर्थसंकल्प सादर केल्याप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे का? उत्पन्नात वाढ झाली आहे का? उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर्मचार्‍यांना काम करावे लागेल. एल.बी.टी. उत्पन्न 12 कोटी उत्पन्नाची उपेक्षा आहे. त्यासाठी व्यापार्‍यांचे वर्कशॉप घ्यावे. सध्या एल.बी.टी. 1 कोटी 62 लाख उत्पन्न मिळाले आहे. व्यकट डहाळे यांनी मनपा निधी 5 लाखापर्यंत देण्यात यावा अशी मागणी केली. गणेश देशमुख यांनी परभणी फेस्टीव्हल गणपती स्थापने नंतर प्रसादासाठी निधीची तरतुद करावी. मनपाकडून खेळाडूंना बाहेरगावी खेळण्यासाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे यासाठी निधीची तरतुद करावी. या विषयावर विजय धरणे यांनी उरूसा निमित्त्य खेळांडूना फुटबालसाठी 1 लाख निधी तरतूद करावी. तसेच मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यासाठी 3 स्कुल बस घ्याव्यात अशी तरतूद करावी. सौ. आश्‍विनी वाकोडकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी निधीची तरतुद करण्यात यावी. महिलांनसाठी शहरामध्ये 3 जीम्ससाठी निधीची तरतूद कराण्यात यावी. तसेच महापौर यांच्यासाठी निवासस्थान बांधावे या विषयावर व्यकंट डहाळे यांनी रस्ता दुरूस्ती,नाली दुरूस्ती यासाठी निधीची तरतूद कराण्यात यावी. सभापती बाळासाहेब बुलबुले यांनी मॅरेथान स्पर्धेसाठी 5 लाख रूपययांची तरतूद करण्यात येईल असे सांगितले. तसेच सभापती बुलबुले यांनी नगरसेविका सौ. अर्चना नगरसाळे यांनी बसवेश्‍वर जयंती निमित्त विनंती अर्ज देण्यात आला आहे.  तसेच ज्योतीबा फुले जयंती निमित्त निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच  वैशिष्ट्ये पूर्ण योजनेमध्ये जिंतूर रोड या परिसरात लहाण मुलांनसाठी नवीन उद्यान करण्यात यावे या विषयावर अनुमोदन उदय देशमुख वैशिष्टये पूर्ण योजनेमधून 10 कोटी गार्डन साठी मागणी अर्थसंकल्पात  मागणी केली. या विषयावर सुनिल देशमुख यांनी क्रिडा विभागासाठी विंडो हॉलसाठी 2 कोटीची तरतूद करावी. तसेच या विषयावर सौ. वाकोडकर यांनी महिला दिनानिमित्त  निधीची तरतूद करण्यात यावी असे सांगितले. तसेच सुनिल देशमुख यांनी नटराज रंग मंदिरसाठी निधीची तरतूर करावी. या विषयाव आयुक्त राहूल रेखावार यांनी सर्व सभागृहाचे अंदाज पत्रक मंजूर केल्याबद्दल  आभार व्यक्त करातो. शहरातील नटराज रंग मंदिर दुरूस्तीसाठी 4 कोटी 25 लाख रूपये निधीसाठी बँकेकडून कर्ज घेणार आहे असे सांगितले. महिलानसाठी 5% निधी राखीव ठेवला आहे. विंडो हॉलसाठी तरतूर करू असे सांगितले. जिंतूर रोड गार्डनसाठी तरतूद करण्यात येईल असे सांगितले. महापौर मॅरेस्थान स्पर्धेसाठी 5 लाख रूपये निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असे सांगितले. महापौर निवासस्थान, आयुक्त निवास स्थान, व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानासाठी तसेच महिलानसाठी 3 जिम्सची तरतूर करण्यात येईल. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 3 लाख रू.तरतूद करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी 3 बसेस सुरू करण्यात येतील. ऊरूस फुटबॉल स्पर्धेसाठी 1 लाख रूपयांची तरतूर करण्यात येईल. खेळांडूनसांठी साहित्य खरेदी निधी वाढविण्यात येईल. राजाराणी मंगलकार्यालयासाठी 30 लाख रूपये तरतूद करण्यात आली आहे. दूरूस्त करून 29 वर्षासाठी लिजवर देण्यात येईल असे सांगितले. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मुख्य लेखाधिवकारी अनिल गिते, लेखाधिकारी मानमोठे, लेखाधिकारी राठोड, यादव, केशव धोंडे, मुथायर खान, पिंपळे, सावंत आदींनी परिश्रम घेतले.

via Blogger http://ift.tt/2mmKf6M




from WordPress http://ift.tt/2lEp7uq
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.