शहरात दिवसेंदिवस दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली अाहे. अनेक शहरातील कार्यालयातील कर्मचारी सुध्दा मुख्यालयी न राहता आपल्या वाहनाने बाहेरगावावरून कार्यालयात येणे- जाणे करतात. यामधील काही कर्मचारी विशिष्ठ ठिकाणी गाडी ठेऊन दुसऱ्या ठिकाणच्या कार्यालयात कामास जातात. त्यामुळे शहरातील काही चक्क “पार्किंग प्लेस” झाल्याचे दिसुन येते.
याचेच उदाहरण द्यावयाचे झाल्यास चांदुर रेल्वे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यासह अनेक ठेकेदारांच्या दुचाकी, चारचाकी वाहने ठेवतात. पंचायत समिती कार्यालयात केवळ त्यांच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वाहने व कामानिमित्य येणाऱ्या नागरीकांची वाहने ठेवण्या एवढी जागा आहे. मात्र नो पार्कींगचे उल्लंघन करून कोणीही येऊन या कार्यालयाच्या आवारात वाहणे दिवसभर उभी ठेवतात. त्यामुळे पंचायत समितीचे आवार जणु “पार्किंग प्लेस” झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर पंचायत समितीचे अधिकारी मात्र कोणतीच कारवाई करीत नसल्याचे दिसते. याबाबत पंचायत समितीशी संपर्क साधला असता सद्या जि.प. निवडणुकीची मतदान प्रक्रीया सुरू असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांच्या गाड्या या आवारात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र असे असले तरी निवडणुकीचा विषय वगळता इतर कार्यालयीन दिवशी सुध्दा अनेक कार्यालयाचे कर्मचारी, ठेकेदार आपआपली वाहने पंचायत समितीच्या आवारातच ठेवतात परंतु पंचायत समितीचे अधिकारी मात्र या बाबीकडे चक्क दुर्लक्ष करताय एवढे मात्र खरे !
via Blogger http://ift.tt/2m05YUV
from WordPress http://ift.tt/2ld9J84
via IFTTT
No comments:
Post a Comment