Latest News

अजंता फार्माचे संचालक मन्नालाल अग्रवाल यांच्या शुभहस्ते पाणपोईचे उदघाटन.- वीर जिवाजी पथकाचा स्तुत्य उपक्रम                            

वाशिम / महेन्द्र महाजन    –

वीर जिवाजी सहानुभूती मदत पथकाच्या वतीने नगरसेवक मोहनराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतीक्षा जेन्ट्स पार्लर च्या बाजूला पाणपोई चे ऊदघाटन अजंता फार्माचे संचालक तथा दानशूर व्यक्तिमत्व मन्नालाल अग्रवाल यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंनट बालकीसन अग्रवाल,उत्तमसेठ बगडीया,पथकाचे सल्लागार व मार्गदर्शक बद्रीसेठ तोषनीवाल,न.प मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे , नगरसेवक मोहनराव देशमुख,रवि अंभोरे व पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.सुरुवातीला जीवाजीच्या प्रतिमेचे पूजन करून मन्नालाल अग्रवाल सह मान्यवरांचा पथकाच्यावतीने रवि अंभोरे व बद्रीसेठ तोषनिवाल यांनी शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला.ज्यांचा वाढदिवस होता असे मोहनराव देशमुख व साकेत जयंत वसमतकर यांचा मन्नालालजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मन्नालालजींच्या अजंता फार्मा कंपनीच्या भारतासह विदेशात शाखा आहेत एक जागतिक दर्जाचे उद्योजक म्हणून ते सर्वपरिचित आहेत परंतु धन संपत्तीचा कोणताही घमंड न बाळगता रिसोड या जन्मभूमीच्या ऋणात राहून या मातीशी नातं आधीक घट्ट करण्याचा प्रयत्न समाजसेवी उपक्रमाच्या माध्यमातून मन्नालालजी करीत असतात. रिसोड न.प ची शाळा अत्याधुनिक केली, स्मशानभूमी सोंदर्यीकरन केले तर येत्या काळात उर्दू शाळांची इमारतीसह डिजिटल करण्याचा संकल्प केला.मन्नालालजी समता फौंडेशन च्या माध्यमातून शेकडो गरजू व गरीबांकरिता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी पथकाच्या बद्रीसेठ च्या विनंतीला स्वीकारून  उदघाटनाला  मांनालालजीची उपस्थितीती म्हणजे  साक्षात भगवान शंकराने दर्शन दिल्याचा अनुभव  येतो असे गौरोउद्गार रवि अंभोरे यांनी व्यक्त केले. आपल्या मनोगतात मन्नालालजीनी काशीनाथ कोकाटे व वीर जिवाजी सहानुभूती   पथकाच्या उपक्रमाची व कार्याची दखल घेत  पथकाचे कौतुक केले  व सर्वोतोपरी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. व सर्व पत्रकार बांधव समाजकार्यात नेहमीच सहकार्य करतात व रिसोड शहराचे प्रेम नेहमी मातृभूमीकडे येण्याकरिता आकर्षित करते असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. प्रसंगी पत्रकार जयंत वसमतकर, पी.डी पाटील, विवेकानंद ठाकरे, संतोष वाघमारे, अनंत भालेराव,रुपेश बाजड,सुरेश गिरी, महादेव घुगे,अन्सारोद्दीन शेख,प्रवीण अग्रवाल,विजय देशमुख,गणेश देगावकर,चाफेश्वर गांगवे,रामभाऊ कोकाटे, वसू साहेब,अरुणभाऊ क्षीरसागर,अलंकार खैरे,ऍड नारायण बाबर,शेख बाबा शेख लतीफ, तय्यब खान  ईत्यादीसह पथकाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन काशिनाथ कोकाटे तर आभार पथकाचे मार्गदर्शक बद्रीनारायण तोषणीवाल यांनी आभार मानले.

via Blogger http://ift.tt/2lGmsPb




from WordPress http://ift.tt/2lGlq5Q
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.