चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)
चांदुर रेल्वे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन सर्कलसाठी होणार्या निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी आजची रात्र म्हणजे उमेदवारांसाठी ‘कत्ल की रात’ ठरणार आहे. विजयासाठी उमेदवार साम-दाम-दंड ह्या सर्व बाबींचा उपयोग करणार असल्याने निवडणूक कर्मचार्यांसह पोलिसांनाही डोळ्यात तेल घालून गस्त करावी लागणार आहे.
आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून गाड्यांवर बोर्ड लावून फिरणेसुद्धा बंद झाले आहे. परंतु ह्या तालुक्यातील आमला, घुईखेड व पळसखेड तीनही सर्कसमध्ये अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने काहीही झाले तरी चालेल, मतदाराला कोणत्याही प्रकारचे आमिष देऊन मतांचा कौल आपणाकडे करून घेण्याचा प्रयत्न आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवार करणार असून त्यासाठी दारू आणि पैसा ह्या गोष्टीचा मोठय़ा प्रमाणात ह्या दोन्हीचा वापर होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढणार असून रात्रीच्या वेळी गटागटाने फिरणार्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून त्यांना गस्त घालावी लागणार आहे
via Blogger http://ift.tt/2lc4A07
from WordPress http://ift.tt/2llv9hO
via IFTTT
No comments:
Post a Comment