यवतमाळ-
भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सहा
सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरीकांची सोय होणार आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे नक्कल पुरविणे,
मोजणी प्रकरणे, आकारफोड करणे, फेरफार नोंदणी, मिळकत पत्रिकेची पोटविभागणी
करून मिळकत पत्रिका स्वतंत्र करणे, भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता सेट बॅक,
रिझर्वेशन याबाबत शासन, संबंधित प्राधिकारी यांचे नावे स्वतंत्र मिळकत
पत्रिका तयार करणे आदी सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहे. याबाबतची सविस्तर
माहिती yavatmal.nic.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. आपले सरकार
वेबपोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वि. ग. घनवट यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2mbQYjJ
from WordPress http://ift.tt/2mbWmUb
via IFTTT
No comments:
Post a Comment