अचलपूर शहरातील एटीएम ची दयनीय अवस्था झाली आहे.कुठे पैसे नाही तर कुठे लाईजची व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य.
अचलपूर शहरात एटीएम मशीन स्टेटबँक,सेट्रल बँक व ईतर बँकमीळून चार एटीएम आहेत पैकी देवळी पोलीस चौकीजवळील एटीएम बंदच असते तर सेट्रल बँके जवळच्या एटीएम मध्ये पैसेच नसते.स्टेट बँकेच्या दोन पैकी एक चावलमंडी येथे बँक शाखेजवळ आहे तर दुसरे देवळी अचलपूर पोलीस स्टेशन जवळ आहे.यामधील अचलपूर पोलीस स्टेशन जवळ असलेल्या एटीएम मध्ये सुरक्षिततेची फार वानवा झाली आहे.येथे सुरक्षा रक्षक तर नाहीच पण रात्रीच्या वेळेस या एटीएम मध्ये लाइट सुध्दा व्यवस्था नसल्याने नागरिकांना पैसे काढायला त्रासदायक ठरत आहे चक्क मोबाईल बँटरीच्या प्रकाशात व्यवहार करावे लागत आहे.यामुळे नागरिकांना कमालीची असुरक्षितता वाटत आहे शिवाय आर्थिक असुरक्षितता वाढत आहे.एखाद्यासोबत पैश्याच्या लुबाडणूकीची सुध्दा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी बँक प्रशासनाने वेळीच काही उपायोजना करावी अशी जनतेची मागणी आहे.
via Blogger http://ift.tt/2lTYdz9
from WordPress http://ift.tt/2lJIiS5
via IFTTT
No comments:
Post a Comment