पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या तीन वर्षात गोरगरीबांच्या विकासासाठी व शेतकर्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. सदर योजना पक्ष कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकांपर्यत पोहचवाव्या. तसेच जनतेच्या समस्या सोडवून पक्ष संघठन मजबुत करावे असे प्रतिपादन आमदार लखन मलीक यांनी केले.
स्थानिक सर्कीट हाऊस येथे आज रविवार, 26 फेब्रुवारी रोजी तालुका व शहर भाजपाच्या वतीने बुथ निवडीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष बंडू पाटील महाले हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक आम. लखन मलीक हे होते. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नानवटे, संगानियो अध्यक्ष शरद पाटील चव्हाण, शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सुरज चौधरी, महिला आघाडी अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख, नंदाताई बयस, उषाताई वानखेडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बंडु पाटील यांनी पक्षाची पाळेमुळे ग्रामीण भागात रुजविण्यासाठी प्रत्येकाने काम केले पाहीजे. तसेच प्रत्येक सर्कलमध्ये बुथनिहाय बांधणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राज्यातील महानगरपालीका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीमध्ये भाजपा पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
बैठकीला जेष्ठ भाजपा पदाधिकारी हरिभाऊ महाले, तालुका सरचिटणीस प्रल्हाद गोरे, विलास ढगे, संगानियो सदस्य भगवान कोतीवार, गजानन गोटे, जगन्नाथ वानखेडे, रामभाऊ भिसे, नागोराव वाघ, मोहन गांजरे, गजानन पातोंडे, रतन मुसळे, मारोती वाबळे, संतोष तोंडे, रामप्रसाद सरनाईक, जगदीश देशमुख, प्रकाश शिंदे, निळकंठ वाकुडकर, किशोर ठाकरे, जगन्नाथ वानखडे, मदन सावके, साहेबराव उगले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. बैठकीचे संचालन तालुका सरचिटणीस दत्ता सुरदुसे यांनी तर आभार गजानन पातोळे यांनी मानले.
via Blogger http://ift.tt/2ld5gif
from WordPress http://ift.tt/2lY5jDb
via IFTTT
No comments:
Post a Comment