अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अमरावती जिल्यातील सलग दुसरी घटना
अचलपूर तालूक्यातील परतवाडा शहरातील रवी नगर येथील रहिवासी अंकीत गजानन वसू (23) या तरूणाने आईवडील मतदानाला गेले असता घरी एकटा असतांना दुपारी चार च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपली जिवनयात्रा संपवली.मतदान करून आल्यावर आईवडिलांना हे कळले त्यांनी परतवाडा पोलीस स्टेशन ला कळवले .
अंकित हा एकूलता एक मुलगा असून चिखलदरा येथे बि.एस.सी. चा विद्यार्थी होता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता होता.परतवाडा पोलीस स्टेशन येथे आत्महत्येची नोंद करण्यात आली असून वृत्त लीहीस्तोवर आत्महत्येचे कारण समजू शकले नाही पुढील तपास ठाणेदार कीरण वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलीस करीत आहे.
via Blogger http://ift.tt/2kVbNyd
from WordPress http://ift.tt/2mi96YD
via IFTTT
No comments:
Post a Comment