चांदूर रेल्वे / शहेजाद खाण –
२१ फेब्रुवारीला चांदूर रेल्वे तालुक्यातील तीन जि.प.सर्कलकरीता मतदान शांततेत पार पडले. आज २३ पेâब्रुवारीला तीन जि.प.सर्कलची मतमोजनी स्थानिक तहसील कार्यालयात सकाळी १० वा.सुरू होणार आहे़ तालुक्यातील आमला विश्वेश्वर, पळसखेड व घुईखेड या तीन जि.प.सर्कलमध्ये निवडणूक लढणाऱ्या २० उमेदवाराचे राजकिय भाग्याच्या फैसला होणार आहे.
या मतमोजणीसाठी एकूण २७ मतमोजनी अधिकारी ३ पर्यवेक्षक व ९ चपराशी असे एकूण ३९ कर्मचारी राहणार आहे. मतमोजनीसाठी नऊ टेबल राहणार आहे. प्रत्येक टेबलवर तीन मतमोजनी अधिकारी व एक शिपाई आणि प्रत्येक तीन टेबल मिळून एक पर्यवेक्षक राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एका जि.प.सर्कलमध्ये २६ मतदान केंद्र असून एका सर्कलचा निकाल एक तासात लागण्याची शक्यता आहे. तर तीन जि.प.सर्कलचा निकाल २ वाजेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे़ प्रथम आमला विश्वेश्वर त्यानंतर पळसखेड व शेवटी घुईखेड जि.प.सर्कलची मतमोजनी पार पडेल. या निवडणूकीचा निकाल एैकण्यासाठी कार्यालयाबाहेर तालुक्यातील नागरिक मोठी गर्दी उसळणार आहे. त्यामूळे प्रशासनाने जनतेला निकाल एैकण्यासाठी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था केली आहे़ तहसील कार्यालय समोरच्या रस्त्यावर जनतेची होणारी गर्दी पाहता या रस्त्यावरून एकेरी वाहतूकीची व्यवस्था केली आहे. तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस ठाणेदार यांच्यावर राहणार आहे.
via Blogger http://ift.tt/2kO6THX
from WordPress http://ift.tt/2mnazwC
via IFTTT
No comments:
Post a Comment