चांदुर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परीषदेचे घुईखेड, आमला विश्वेश्वर व पळसखेड या तीन गणासाठी निवडणुक होत असुन या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांत काट्याची लढत होत असुन कॉंग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप व भाजपाचे माजी आमदार अरूण अडसड यांची प्रतिष्ठा पणास लागली असुन यात कोणाचा विजय होईल याचा फैसला गुरूवारी होणार असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घुईखेड सर्कलमध्ये एकुण ७ उमेदवार, पळसखेड सर्कलमध्ये ७ उमेदवार तर आमला विश्वेश्वर सर्कलमध्ये ६ उमेदवारांनी या निवडणुकीत उडी घेतली असुन जनता दल (सेक्युलर), भाजपा, कॉंग्रेस, शिवसेना, युवा स्वाभिमान, भाकपा, बसपा, भारीप- बमसं, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी आपले उमेदवार निवडणुक रींगणात उतरविले आहे. तर अपक्ष उमेदवार सुध्दा आपले नशीब आजमावत आहे. निवडणुक रींगणातील उमेदवारांनी आपला प्रचार थांबविला होता तरी सोमवारी रात्रीपर्यंत मतदारांशी संपर्क ठेवुन उमेदवार आपला प्रचार सुरू ठेवला होता. या निवडणुकीतील वैशिष्ठ म्हणजे घुईखेड सर्कलमधुन मागील निवडणुकीत विजयी झालेले कॉंग्रेसचे उमेदवार प्रविण घुईखेडकर यांच्या पत्नी राधिका घुईखेडकर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. प्रविण घुईखेडकर यांनी मागील पाच वर्षात आपला जनसंपर्क कायम ठेवून अनेक विकासाची कामे केल्यामुळे त्याचा फायदा पत्नी राधिका यांना नक्कीच होणार असुन त्यांनी मतदार संघातील विविध गावांमध्ये वृध्द, शेतकरी- शेतमजुर, युवक, पुरूष- महिला यांच्याशी संपर्क साधुन शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या सीमा देशमुख, जनता दलाच्या सरीता शहाडे यांनी सुध्दा प्रचाराचा धुराडा उडविला अाहे. तर पळसखेड सर्कलमध्ये भाजपाचे पंजाब राऊत व कॉंग्रेसचे नितीन गोंडाणे यांच्यात थेट लढत असुन भारीप- बमसंचे प्रशांत पाटील व युवा स्वाभिमानचे चंद्रकांत खडसे या दोघांनाही टक्कर देतील अशी शक्यता वर्तविल्या जात आहे. याशिवाय आमला सर्कलमधुन भाजपाच्या अैड. विजया पखाले, कॉंग्रेसच्या रंजना गवई व जनता दल (सेक्युलर) च्या अैड. सुनिता भगत यांच्यात तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमला सर्कलमध्ये भाजपाचा बोलबाला असल्याचे दिसत असुन कॉंग्रेसच्याही उमेदवार चांगली टक्कर देत आहे. मात्र सोमवारी आमला येथे जनता दलाच्या झालेल्या सभेमधील लोकांची गर्दी पाहता जनता दलाचे चिन्ह असलेली “ओझेवाली बाई” या सर्कलचे गणित बिगडविणार आहे ऐवढे मात्र नक्की.
चांदुर रेल्वे तालुका हा कॉंग्रेसचा बालकिल्ला म्हणुन ओळखल्या जातो. त्यामुळे कॉंग्रेसच्या बालकिल्ल्यात खिंडार पडणार का ? हे आज मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी गुरूवारी कळणार आहे.
via Blogger http://ift.tt/2lFrkXc
from WordPress http://ift.tt/2lgh5YB
via IFTTT
No comments:
Post a Comment