दाभोलकर-पानसरे हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेवर अविवेकी टीका !
कॉ. पानसरे यांच्या हत्येला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरोगामी
मंडळींनी जाहीर कार्यक्रमांतून आक्रस्ताळी आणि अविवेकी भाषणे करून
न्यायालयाने कोणताही निकाल देण्यापूर्वीच सनातन संस्थेला दोषी ठरवण्याचा
नेहमीचा कार्यक्रम पार पाडला. एकीकडे ‘भक्कम पुरावे आहेत’ असे म्हणायचे आणि
दुसरीकडे खटला लांबवण्यासाठी तांत्रिक कसरती करून न्यायालयात खटलाच चालू
द्यायचा नाही, हा दाभोलकर-पानसरे कुटुंबियांचा दुटप्पीपणा आहे. समीर
गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या विरोधात खरंच पुरावे आहेत, तर
मग ‘मॉर्निंग वॉक’चे देखावे करून ‘मिडीया ट्रायल’ न चालवता न्यायालयात खटला
चालवण्याचे धाडस दाखवावे, असे थेट आव्हान सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय
वर्तक यांनी तथाकथित पुरोगाम्यांना दिले आहे.
न्यायाचा
लढा न्यायालयात न लढता रस्त्यावर लढण्याची भाषा करण्यामागे दाभोलकरांच्या
परीवार ट्रस्टमधील घोटाळ्यांची आता नियमित चौकशी चालू झाली आहे, हे खरे
दुखणे आहे, असेही वर्तक म्हणाले.
वागळे सध्या ‘बेकार’ आहेत, त्यांचे आरोप नैराश्येतून !
‘समीर गायकवाड आणि डॉ. तावडे यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे’, ‘सारंग
अकोलकर आणि विनय पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे’, म्हणजेच ‘सनातन
संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवरील आरोप सिद्ध होत आहेत’, असे
अतार्कीक विधान ज्येष्ठ पत्रकार (?) वागळेंनी या वेळी केले. एखाद्यावर
आरोपपत्र दाखल होणे, म्हणजेच गुन्हा सिद्ध होणे, असा तर्क मांडणार्या
वागळेंना पत्रकारीतेत इतकी वर्षे घालवूनही त्यांना कायदेशीर गोष्टींचे
प्राथमिक ज्ञान नाही, हेच सिद्ध होते. एकीकडे विचारांचा लढा विचारांनी लढा,
असे म्हणायचे आणि सनातन संस्थेने तिच्यावर झालेल्या आरोपांविषयी पत्रकार
परिषद घेतली, तर लगेच ‘सनातन’वाले पोलिसांवर दबाव टाकतात, असे म्हणायचे !
हा वागळेंचा वैचारिक गोंधळ आहे. लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकारांवर ही
एकप्रकारे आणलेली गदाच आहे. लोकशाहीचा टेंभा मिरवणारे वागळेंसारखे पत्रकार
हेच ढोंगी आणि अविवेकी असून त्यांचे हे आरोप निवळ सनातनद्वेष आणि सध्या
बेकार असल्याने आलेले नैराश्य यांतून केले आहेत, असेही वर्तक यांनी म्हटले
आहे.
पानसरेंच्या ‘लाल सलाम’वाल्या समर्थकांचे हात
केरळ आणि बंगाल मधील हिंदूंच्या हत्यांनी लाल झालेले असतांना त्यांनी
दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांवर छाती पिटून रडणे, हा दुटप्पीपणा आहे. खुनी
इतिहास आणि वर्तमान असणारे कम्युनिस्ट ‘सनातन’ला गुन्हा सिद्ध झालेला
नसतांनाच खुनी म्हणत आहेत, हा एक विनोदच आहे.अशा आशयाच प्रसिद्धी पत्रक *श्री. अभय वर्तक,* प्रवक्ता, सनातन संस्था. यांनी प्रसिद्ध केले आहे
via Blogger http://ift.tt/2lnQNDH
from WordPress http://ift.tt/2kYTSXk
via IFTTT
No comments:
Post a Comment