चांदूर रेल्वे / शहेजाद खान —
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळा सर्वांगीण विकासासाठी सगळीकडून प्रयत्न होत असतांना तालुक्यातील सावंगा बू या पुनर्वसन गावातील जिल्हा परिषद् शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बूट वाटप करण्यात आले, दत्त महिला ग्रामीण बहुद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या वतीने हे बूट विद्यार्थ्यांना देण्यात आले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात लोकसहभागावर भर देण्यात आला आहे, गट साधन केंद्रातील विषय तज्ञ मंगेश उल्हे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले असून स्थानिक दत्त इंडियन गॅस चे वितरक जीतू गोरे ह्यांनी त्यांचा संस्थे तर्फे हे बूट वाटप केले आहे, यावेळी गावातील अनेक पालक उपस्थित होते, यासोबतच केंद्र प्रमुख चंद्रशेखर रामटेके, विषयतज्ञ विवेक राऊत, मुख्याध्यापक शिंगाने आदि उपस्थित होते, सर्वांना बूट मिळ्याल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता शाळेचे मुख्याध्यापक यांनी श्री गोरे यांचे आभार मानले
via Blogger http://ift.tt/2maYPy6
from WordPress http://ift.tt/2lu6zLr
via IFTTT
No comments:
Post a Comment