Latest News

अचलपूरच्या नगरपालिकेचा अजब गजब कारभार- गणित चे शिक्षक बेपत्ता.मॅट्रीक ची परीक्षा 7 मार्च पासून

*म्युनिसिपल हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात*
मुख्याधिकारी लागले शौचालय च्या पुरस्कारा मागे
विद्यार्थी पकड़त आहेत गणिताच्या नावाने कान

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांना मॅट्रीकच्या अभ्यासक्रमाचे नाही काही घेणेदेणे
गणिताचे शिक्षक पद मुक्त, विद्यार्थी गणितमुक्त

शहरातील नागरिकांनो तुम्हाला वाटेल ते करा , नाही शिकवणार गणित

परतवाड़ा – / प्रमोद नैकेले – 
 आज नपा ची आम सभा होणार आहे . या सभेत मोठे मोठ मोठ्या विषयावर चर्चा होणार आहे,निर्णय पण घेतले जातील.म्हणतात ना दिव्या खाली अंधार ही म्हणी तंतोतंत नगरपालिका प्रशासना ला लागू होते.हागंदारी मुक्त चा पुरस्कार प्राप्त करण्यास आसूसलेले अक्षम अधिका-यांना या सभेपूर्वी हे सुध्दा माहिती नाही की त्यांच्या मालकीची व सर्वात प्राचीन म्युनिसिपल हाईस्कूल चा एक गणित शिक्षक या दिवसात बेपत्ता आहे. विद्यार्थ्यांकरीता काही पर्यायी व्यवस्था नसल्याने  शाळेचे हाल बेहाल आहेत.तसेच मॅट्रीक ची परीक्षा 7 मार्च  पासून सुरू होत आहे.परीक्षेच्या काळात  उजळणी , महत्वाच्या प्रश्नांचा सराव,अडचणी दूर करणे याला महत्व असते.येथे मात्र पुरस्कार प्राप्त करण्याचे लालसेने चक्क गणीत शिक्षकालाच प्रशासनाने परगांवी रवाना करून दिले आहे .आता पालक ओरडत राहा.ही आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष , उपाध्यक्ष व नगरसेवक यांचे कडून शहराचे भविष्य विद्यार्थी व पालकांना नगरपालिका तर्फे पहल्या जनरल मीटिंग ची भेट. 27 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांच्या मागे फीरत असलेले आमच्या नगरसेवकांना विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे दिसत नाही.  शिक्षण सभापति व एकाही नगर सेवकाला विद्यार्थ्यांच्या भविष्य चे काही घेणेदेणे नाही. अजून एक महीना पण झाला नाही सत्तेत येवुन तर विद्यार्थ्यांना हे दिवस पाहायला मिळत आहे.पुढे हे लोक जर म्युनिसिपल हाईस्कूलची जमीन सुद्धा विकून टाकतील तर काही आश्चर्य नाही. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे नगरसेवक, नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाद्वारा नियुक्त मुख्याधिकारी यांचे नावमात्र एकत नाही अशी तक्रार स्वतः नवनिर्वाचीत सदस्य करीत आहेत.मुख्याधिकारी यांचे एकच स्वप्न हागणदारी मुक्तचा पुरस्कार मीळवायचे मग त्याकरिता काही खोटे काम करावे लागेल तरी बेहत्तर शहर,शाळेचे काही होवो कुणाला किती ओरडायचे ते ओरडा आपल्याला पाहिजे पुरस्कार मग तो खोटा का असेना. ही आहे मुख्याधिकारी यांची भिष्मप्रतिज्ञा

via Blogger http://ift.tt/2kFjGHP




from WordPress http://ift.tt/2l01rQW
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.