विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेचे दिवस म्हणजे खेळणे ,बागडणे व शिकुन सुसंस्कृत होणे अशातच दहावी पर्यंत ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला सोडून जाणे म्हणजे मित्रांसोबत व शिक्षिका सोबत बनलेले ऋणानुबंध सोडून जाताना सर्वांचे मन भरून जाते.
अश्याच भावनीक पध्दतीने स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे स्वागत करून आपल्या शाळेतील अनुभव व शिक्षकाप्रती आपले विचार मांडले.कार्यक्रमांचे अध्यक्ष शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री प्रमोद नैकेले,पर्यवेक्षक एस.डी.झंवर,शिक्षक प्रतिनिधी स्वाती सवाई,जेष्ठ शिक्षक एम.के.येवूल व आर.एस.जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतन शर्मा,दिलीप बोबडे,स्वाती सवाई व एस.डी.झंवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच महेश शेरेकर यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन व संचलन संजय अग्रवाल यांनी केले अध्यक्षीय भाषणात पी.एस.नैकेले यांनी शुभेच्छा देवून परीक्षेच्या वेळी घ्यायच्या खबरदारी व परीक्षेच्या तयारी बद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्प देवून त्यांचे आभार मानून आर्शीवाद घेतला व अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
via Blogger http://ift.tt/2m3wgSo
from WordPress http://ift.tt/2kGHuLA
via IFTTT
No comments:
Post a Comment